Satara ZP : "सातारचे पोलीस सत्तेसाठी गोळ्या घालायलाही कमी पडणार नाहीत" : भाजप पदाधिकाऱ्याकडूनच पक्षाचे वाभाडे; पदावरून तातडीने हटवलं

Satara ZP : साताऱ्यात सत्तेसाठी पोलिसांचा वापर केल्याचे सांगणारी भाजप नेते संतोष कणसे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजपने त्यांची तत्काळ हकालपट्टी केली असून विधीमंडळात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
Viral audio clip of BJP District General Secretary Santosh Kanse has stirred a political storm in Satara.
Viral audio clip of BJP District General Secretary Santosh Kanse has stirred a political storm in Satara.
Published on
Updated on

सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा गळा घोटून सत्ता मिळविल्याची चर्चा सर्वत्र आहे. याचे पडसाद सोमवारी (23 मार्च) विधानसभा आणि विधानपरिषदेतही उमटले. सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने मतदान प्रक्रियेत केलेला हस्तक्षेप, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना झालेली धक्काबुक्की हे स्वतः त्यांनी दोन्ही सभागृहात सांगितले.

पण या घटनेनंतर एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांचे हे रेकॉर्डिंग असल्याचे सांगितले जात. यात पोलिसांचा सत्तास्थापनेत कसा चुकीच्या पद्धतीने वापर झाला, यावर भाष्य केले गेले. त्या रेकॉर्डिंगनंतर भाजपने पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचे सांगत तत्काळ कणसे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची जिल्हा सरचिटणीस पदावरून हकालपट्टी झाली आहे.

झेडपीतील सत्तास्थापनेनंतर कणसे यांनी पुणे जिल्ह्यातील एका दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत फोनवर निवडणुकीबाबत चर्चा केली. या चर्चेवेळी त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. नीतिमत्ता बाजूला ठेवत पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सत्ता स्थापन केल्याचा गंभीर आरोप या संभाषणात करण्यात आला. झेडपी सदस्य फोडण्यासाठी पोलिसांना सुपारी दिली असून, हे घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे.

Viral audio clip of BJP District General Secretary Santosh Kanse has stirred a political storm in Satara.
BJP dominance : एकनाथ शिंदेंचा 'गेम प्लॅन' फसला; पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांनंतर फडणवीसांचाच डंका; झेडपीत भाजपच ठरला 'मोठा भाऊ'

सहा सदस्य भाजपने फोडून सत्ता स्थापन केली, तसेच मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना यांना धक्काबुक्की होण्याचे प्रकारघडत असल्याने राजकारण कुठल्या थराला गेल्याचे सांगत हे पटले नसल्‍याची खंतच जणू व्‍यक्‍त केली. तसेच पुढच्या वेळी पोलीस प्रशासन सत्तेसाठी विरोधी सदस्यांना गोळ्या घालायलाही कमी करणार नाही, अशी चिंता बोलून दाखवली.

Viral audio clip of BJP District General Secretary Santosh Kanse has stirred a political storm in Satara.
Satara ZP : भाजपकडून गळचेपी : शिवसेना मंत्र्यांची थेट राजीनाम्याची भाषा; पण, सत्तेचा खेळखंडोबा करणारे 'ते' प्रकरण नेमकं काय?

हे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर भाजपने कणसे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची जिल्हा सरचिटणीस पदावरून हकालपट्टी झाली आहे. पण या कारवाईनंतर जिल्हा परिषद सत्तास्थापनेची पारदर्शकता, प्रशासनाची भूमिका आणि भाजपने पदाधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईमुळे समाज माध्यमावर चर्चांना उधाण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com