Sadabahu khot, Gopichand Padalkar
Sadabahu khot, Gopichand Padalkar Sarkarnama
मुंबई

Gopichand Padalkar News : मला सभागृहात एकटे-एकटे वाटत होते; खोतांच्या उमेदवारीनंतर पडळकरांची मिश्किल टिप्पणी

Pradeep Pendhare

Maharashtra Assembly : लोकसभा निवडणुकात सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत होते. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले होते. मात्र, आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी सत्ताधारी व विरोधक नेतेमंडळी समोरासमोर आल्यानंतर हास्यविनोद रंगत आहेत.

मला सभागृहात खूप एकटे-एकटे वाटत होते. परंतु, आता सदाभाऊ माझ्या सोबतीला आले आहेत. आता एकटे वाटणार नाही. विधान परिषदेच्या नावासाठी सदाभाऊ खोत यांची घोषणा होताच आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मिश्किल टिप्पणी केली.

दिली. (Gopichand Padalkar News)

भाजपने सदाभाऊ खोत (Sadabahu Khot) यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी दिली आहे. त्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यावेळी सदाभाऊ खोत विधिमंडळ परिसरातच होते. आमदार गोपीचंद पडळकर हे सदाभाऊ खोत यांना मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून घेऊन विधिमंडळ इमारतीच्या आवारात घेऊन आले.

यावेळी त्यांना भाजपचे नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व प्रवीण दरेकर यांना भेटले. सदाभाऊ खोत यांनी मंत्री विखेसमोर येताच वडीलधारे म्हणून पाया पडले.

यापूर्वी सदाभाऊ खोत हे 2016 ते 2022 या काळात विधानपरिषदेवर होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते काहीकाळ राज्यमंत्री ही होते. दोन वर्षापूर्वी त्यांना भाजपने (Bjp) पुन्हा विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र, ते सहावा उमेदवार असल्याने त्यांना अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास सांगण्यात आले होते. त्याचे बक्षीस या निमित्ताने मिळाले असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात ऐकवयास मिळत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT