Gopichand Padalkar : पोलिसांनो बिनकामाचं घरी जावं लागेल, पडळकरांनी भरला दम !

BJP MLA Gopichand Padalkar : भाजपचे राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आहे. आमदार पडळकर हे फडणवीस यांचे जवळचे मानले जातात.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी चर्चेत असलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दम भरला आहे. खानापूर-आटपाडी तालुक्यात तुमच्या बापाची जहागिरदारी नाही. नोकऱ्या नीट करा, नाही तर बिनकामाचे घरी जावे लागेल,अशा शब्दात पडळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दम भरला आहे.

भाजपचे राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे गृह खाते आहे. आमदार पडळकर हे फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. राज्यात सध्या त्यांच्याच पक्षाची सत्ता असून गृहखाते देखील भाजपकडेच असल्याने त्यांची मनमानी वाढली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यासाठी आमदार पडळकर आले होते. त्यावेळी मेळाव्यात बोलताना त्यांनी मतदार संघातील शासकीय अधिकारी आणि पोलिसांना कडक शब्दात दम भरला.

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Vs Jayant Patil : 'सांगली जिल्हा बँकेतील घोटाळे बहाद्दरांचा म्होरक्या जयंत पाटील' ; पडळकरांचा गंभीर आरोप!

पोलिसांना दम देताना आमदार पडळकर म्हणाले की, कोणा तरी राजकीय पुढाऱ्यासाठी आमच्या लफड्यात पडू नका. नाही तर तुम्हाला सांगतो हे तुमच्यासाठी अडचणीचे होईल. कोणत्याही अधिकाऱ्याला जर आपण राजकीय पुढाऱ्याचे नोकर आहे,असं वाटतय त्यांनी थेट राजीनामा देऊन, त्या राजकीय नेत्याच्या घरी जावून काम करावे,असं देखील पडळकर यांनी पोलिसांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुनावले.

Gopichand Padalkar
Mahavikas Aghadi : आघाडीतील बिघाडीची सुरुवात सांगलीतून...

सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असेल तर आपण प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ,असे देखील आमदार पडळकर यांनी आपल्या भाषणात म्हंटले आहे. केंद्रात गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. तर राज्यात अडीच वर्षाचा अपवाद वगळता भाजप (BJP) महायुतीची सत्ता आहे. राज्यातील अनेक महत्वाची खाती भाजप नेत्यांच्या ताब्यात आहेत. गृहखाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच ताब्यात आहे. असे असतानाही भाजप आमदाराचे पोलिस तसेच शासकीय अधिकारी ऐकत नसेल आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करावी लागत असेल तर इतरांनी कोणाकडे पहायचे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com