MPSC Exam  Sarkarnama
मुंबई

MPSC News :धक्कादायक! MPSC च्या परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर लिक; एमपीएससीकडून 'हा' खुलासा...

Crime News : एकाच लिंकवर ९० हजारांवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध असल्यानं डेटा सेक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर....

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)30एप्रिल परीक्षा होणार आहे. या परीक्षेची जोरदार तयारी सुध्दा विद्यार्थ्यांकडून सुरु आहे. मात्र, याचदरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून सर्वांचेच धाबे दणाणले आहे. या परीक्षेचं हॉल तिकीटची सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(MPSC)च्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये सुमारे 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

तसेच हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे. एकाच लिंकवर ९० हजारांवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध असल्यानं डेटा सेक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एमपीएससीकडून गुन्हा दाखल...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तात्काळ परीक्षेचे हॉल तिकीट(Hall Ticket)ची टेलिग्राम लिंक व्हायरल होत असल्याची दखल घेण्यात आली आहे. ही लिंक कशी व कोणी जनरेट केली? याबाबतचा शोध एमपीएससीकडून सुरु आहे. तसेच या संदर्भात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही एमपीएससीकडून देण्यात आली आहे.

एमपीएससीकडून हा खुलासा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिलला रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब धक्कादायक निदर्शनास आली आहे. यावर एमपीएससीने खुलासा केला आहे.

वेळापत्रकानुसारच परीक्षेचं आयोजन...

ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचं आयोजन करण्यात येईल असंही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT