Kishor Patil News: ''उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांसारखी जादू नाही..''; पाचोऱ्यातील सभेआधीच किशोर पाटलांनी डिवचलं

Kishor Patil Vs Uddhav Thackeray : ''माझा बाप चोरला, बाप चोरला, अरे बाबा…कुणी चोरला हे माहितीय तर पोलीस ठाण्यात तक्रार द्या...''
Kishor Patil Vs Uddhav Thackeray
Kishor Patil Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pachora News : माजी मुख्यमंत्री व शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांची आज (दि.२३) संध्याकाळी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा आहे. मात्र, या प्रचारसभेपूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जादू नसल्याचं म्हटलं आहे.

पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या सभेवर भाष्य केलं. पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बाळासाहेबांसारखी जादू नाहीये. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद असती तर त्यांनी 288 मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तसेच सर्वच सभांमधून उमेदवार निवडून आणले असते. असे 50 आणि 50 आमदारांवर ते थांबले नसते. त्यामुळे त्यांच्या इतकी काही जादू नाहीये. त्यांची भाषणं तीच तीच आहेत अशी टीका पाटील यांनी केली आहे.

Kishor Patil Vs Uddhav Thackeray
Amritpal Singh Arrested: अमृतपालला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली ? ; सरकारला काँग्रेसचे सहा प्रश्न...

...तर पोलिसांत तक्रार द्या !

माझा बाप चोरला… माझा बाप चोरला. अरे बाबा… बाप चोरला हे माहीत आहे, कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार द्या ना असं डिवचतानाच उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. 25 हजाराच्यावर 26 हजारावी खुर्ची आली तर मी राजकारण सोडून देईल असा दावाही किशोर पाटील(Kishor Patil) यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची आजची सभा माझ्याविरोधात नाही. ही सभा माझे काका, माझ्या राजकीय गुरुच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे. माझ्या विरोधातील सभा असेल तर माझी प्रतिक्रिया वेगळी असेल. आज ते माझ्या काकांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल. या सभेला कोणताही गालबोट लागणार नाही. तसेच ही सभा शांततेत पार पडावी यासाठी गुलाबराव पाटलांना विनंती करणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

Kishor Patil Vs Uddhav Thackeray
Karnatak Election 2023: 'त्या' ११ बंडखोर आमदारांच्या संपत्तीत वाढ; पण एवढी संपत्ती आली कुठून?

आधी उद्धव ठाकरेंना शिव्या आणि आता...

किशोर पाटलांनी यावेळी दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होणार नाही. माझ्या काकांच्या नावाचा राजकारणात वापर केला जात आहे. ते आजारी असताना विचारपूस केली नाही. आता ते शाखा प्रमुखाची सुद्धा भेट घेत आहेत. माझी ताई आधी उद्धव ठाकरे यांना शिव्या घालत होती. आता ती कडवट शिवसैनिक झाली आहे. माझी ताई हवेत आहे असा टोलाही किशोर पाटलांनी यावेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com