Harshali Chaudhary Files Mayor Nomination | Rahul Damle Deputy Mayor Race sarkarnama
मुंबई

KDMC Mayor Election : कल्याण-डोंबिवलीचे महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हर्षाली थविल यांनी दाखल केला अर्ज

Rahul Damle Harshali Chaudhary Mayor : हर्षाली चौधरी-थवील उपमहापौर पदासाठी भाजपाचे नगरसेवक राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल केला.

शर्मिला वाळुंज

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर पद कोणाकडे असणार यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये एकत्र लढले असले तरी महापौर पदावरून त्यांच्यात रस्सीखेच होती.

महापौर पद हे एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित मानले जात होते. त्या प्रमाणेच युतीमध्ये महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद भाजपकडे जाणार हे ठरले होते. त्या प्रमाणे आज शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी-थवील यांनी आज महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उपमहापौर पदासाठी भाजपाचे नगरसेवक राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसे नेते राजू पाटील उपस्थित होते.

निवड केवळ औपचारिकता

महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने, या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

चार नगरसेवक अपात्र?

कल्याण-डोंबिवली महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी चार नगरसेवक 'नॉट रिचेबल' आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या नगरसेवकांचा शोध ठाकरे सेनेच्या शिवसैनिकाकडून घेतला जात आहे. हे गायब नगरसेवक दोन दिवसात हजर न झाल्यास सदस्यत्व रद्द करण्याबाबत पावले उचलण्यात येतील, असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT