Mumbai, 08 April : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्यातच पाटील यांनी बावनकुळे यांच्यासोबतच भाजपच्या आणखी एका नेत्याची भेट घेतल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भेट घेतली. इंदापूर तालुक्यातील एक सुनावणीचं काम होतं. ती सुनावणी लागत नव्हती, त्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. माझ्यासोबत काही कार्यकर्तेही आहेत. बरेच दिवसांपासून सुनावणी होत नव्हती, तसेच त्या प्रकरणाची ऑर्डर हेात नव्हती, ती व्हावी, यासाठी मी बानकुळे यांची भेट घेतली, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे यांनी मंत्रालयात ती सुनावणी लावण्यास सांगितली आणि खासगी सचिवांना त्याबाबत तातडीने सुनावणी लावण्याची सूचना केली आहे. एवढंच आजच्या भेटीमागचं कारण होतं, असेही हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यापूर्वी मी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही भेटून आलो आहे, त्यांच्याकडेही आमची विद्यापीठ आणि महाविद्यालयांची कामे होती. सरकार म्हटल्यावर जनतेच्या कामासाठी मंत्र्यांना भेटावं लागतं. त्यामुळे ही कामानिमित्त झालेली ही भेट आहे.
हर्षवर्धन पाटील कोठेही जाणार नाहीत, ते आमचेच आहेत, असे दत्तात्रेय भरणे यांनी म्हटलेलं मी कधी ऐकलं नाही. ते जर माझ्या मनात असतील चांगली गोष्ट आहे, अशी मिश्किल टिपण्णीही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
दरम्यान, मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूर आणि पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पंढरपूरनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत असलेल्या लक्ष्मी-नृसिंहाच्या दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी फडणवीसांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हजर हेाते. त्यामुळे पाटलांची भाजपशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, खास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मर्जीने मिळालेल्या राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील अजूनही कायम आहेत, त्यामुळे पाटील यांची भाजपशी पुन्हा जवळीक वाढल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.