
Nagpur, 29 March : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी, ता. ३० मार्च) नागपूरमध्ये येत असल्याने काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संघाचा अजेंडा विभाजनवादाचा असल्याचा आरोप केला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. वडेट्टीवार लांगुलचालन करणाऱ्या पक्षाचे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोलाण्याइतकी त्यांची उंची नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी त्यांना सुनावले.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, काँग्रेसने नेहमी मतांचे लांगूनचालन केले आहे. त्यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नाही. नेहमी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत त्याद्वारे सत्ता भोगली आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांचा एवढा मोठा पराभव का झाला, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.
विजय वडेट्टीवार (Vijay wadetirwar) यांना संघ समजायला खूप वेळ लागेल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागेल. मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलावे एवढी त्यांची उंची नाही. ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. कॉंग्रेसचा दोन समाजात दरी निर्माण करणारा पक्ष असा इतिहास राहिला आहे. संघाची भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी असल्याचे बावनकुळे म्हणाले.
कॉंग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी जरा समज ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेण्यापूर्वी त्यांनी विषय समजून घेतला पाहिजे. आम्ही माहिती घेतली अशा कुठल्याही नावाचा व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आमचे कुठलेच कार्यालय मदत करू शकत नाही. लोंढे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांची बालिशपणाची वर्तवणूक आहे, असा टोलाही त्यांनी प्रशांत कोरटकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयावर निशाणा साधणाऱ्या लोंढे यांना लगावला.
उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल मांडलेले विचार योग्य आहेत. या देशांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे आणि अनेक महापुरुषांबद्दल अपशब्द काढले जातात. हे सहन केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे उदयनराजे यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याबद्दल आमचे सरकार नक्की विचार करेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कठोर कायदा करतील असेही बावनकुळे म्हणाले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.