Bhandara Politic's : अजितदादांच्या आमदाराच्या मदतीला धावले भाजपचे आमदार; 'त्या' अधिकाऱ्यांची थेट फडणवीसांकडे केली तक्रार

Sand Smuggling : त्याच पत्राचा आधार घेऊन आमदार फुके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कारवाईची सूचना दिली आहे.
Raju karemore-Parinay Phuke
Raju karemore-Parinay PhukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 08 April : भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करीत गुंतलेले कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे आमदार परिणय फुके एकत्र आले आहेत. वाळू तस्कर आणि त्यात गुंतलेले अधिकारी यांच्या बाबत मोठा खुलासा करणारे आमदार कारेमोरे यांचे एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याच पत्राचा आधार घेऊन आमदार फुके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कारवाईची सूचना दिली आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय कार्यकर्तेही गुंतले आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने कारेमोरे यांनी वाळू तस्कराच्या विरोधात अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.

वाळू धोरण आणि तस्करी रोखण्यासाठी काय काय उपाय योजना केल्या जात आहेत, राज्य सरकारच्या नवे वाळू धोरण, त्याचे परिपत्रक देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांच्या पत्राची दखल घेतली नाही, त्यानंतर कारेमोरे यांनी आणखी एक पत्र लिहून त्यातून अनेक धक्कादायक माहिती दिली होती.

Raju karemore-Parinay Phuke
Solapur BJP Activist : मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या सोलापुरातील भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याच्या वडिलाचा आमदार निवासमध्ये मृत्यू (Video)

गौण खनिज विभागातील काही अधिकारी हे तस्करी करीत आहेत, त्यात काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गुंतले आहेत, असा असा उल्लेख केला होता. वरपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याने आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाहीत, अशा धमक्याही तस्कारांमार्फत दिल्या जातात, असाही उल्लेख या पत्रात आमदार कारेमोरे यांनी केला होता. त्यानंतरही याची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली नव्हती.

आता आमदार कारेमोरे यांच्या मदतीला आमदार परिणय फुके धावून आले आहेत, त्यांनी याच पत्राचा आधार घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात वाळू आणि खनिजाच्या तस्करीचा उल्लेख केला आहे.

Raju karemore-Parinay Phuke
Karad Politic's : उमेदवारी अर्जांवरील आक्षेप ठरले टर्निंग पॅाईंट अन्‌ ‘अहंकाराच्या शड्डू’ने विरोधकांचा घात केला; संयमी बाळासाहेबांनी पुन्हा मैदान मारले

आता दोन आमदार एकत्र आल्याने अनेक अधिकारी आणि काही राजकीय कार्यकर्ते अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्ह्यात एकूण तीन आमदार आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याही एका आमदाराचा समावेश आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com