Hasan Mushrif, Kirit Somaya sarkarnama
मुंबई

आमच्या मित्रांनीच घात केला, त्यांचे फोन तपासा, सत्य समजेल!

सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने मला कोणाची भीती नाही

सरकारनामा ब्युरो

कागल : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ((Hasan Mushrif)यांची 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती बेनामी असून, त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे देण्यात आली आहे, त्यानुसार मुश्रीफ यांची चौकशी करून त्यांची बेनामी संपत्ती जप्त करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaya) यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. त्याला मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. करनूर (ता. कागल) येथे मुश्रीफ बोलत होते.

''आमच्या कोल्हापूर व कागलमधील काही मित्रांच्या भूमिका तपासल्या, तर योगायोग आपल्या लक्षात येईल. जर या आमच्या मित्रांचे सीआरडी तपासले तर सत्य समजेल,'' अशी टीका मुश्रीफ यांनी कोणाचे नाव न घेता केली. ''कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक सुरु असताना किरीट सोमय्या आमच्या साखर कारखान्याचा विषय घेऊन समोर येतात, हा निश्चितच योगायोग नाही,''असे ते म्हणाले.

करनूर (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सात कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ''माझ्यावर खोटे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा कितीही प्रयत्न करा, पण सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी असल्याने मला कोणाची भीती नाही,''असे मुश्रीफ म्हणाले.

''सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी ऊस उत्पादन शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्या पैशातून केली आहे, कंपनी कायद्यानुसार सर्व व्यवहार आहेत. भष्ट्राचार अथवा मंत्रीपदाचा वापर करुन यात पैसे घातलेले नाही, तरीही माझी नाहक बदनामी हे लोक करीत आहेत,'' असे मुश्रीफ म्हणाले.

''सर्वसामान्यांसाठी मुश्रीफ काम करीत आहेत. त्यांचे काम पाहून काही जणांच्या पोटात दुखते. कामाची ही घैाडदैाड अशीच सुरु राहिली तर आपले काय होईल, अशी भीती त्यांना आहे. मुश्रीफ यांच्यावर कुणी टीका केली तर मी रत्यावर उतरेन,'' असे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले.

''जरंडेश्वर कारखान्यांच्या सभासदांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार भ्रम पसरवत आहेत. कारवाई झाली, तरी कारखाना बंद पडणार नाही. तो सुरूच राहील. हा कारखाना पवार यांचा कधी नव्हताच. तो त्यांनी गैरपणे विकत घेतला. गुरू कमोडिटी ही कंपनी त्यांच्याच भागीदाराची आहे. याही तक्रारीचा आम्ही कायम पाठपुरावा करणार आहोत,'' असेही सोमय्या यांनी काल स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT