सरकार पाडण्याचा गुढ्या उभारण्यापेक्षा कामाच्या गुढ्या उभारा ; मुख्यमंत्र्यांचा टोमणा

महाविकास आघाडी सरकार घट्ट आहे. आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्रच आहोत.
 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi)रुसवे फुगवे असल्याचे वातावरण तयार केले जाते. पण या सरकारचे नाव 'महाविकास आघाडी' असं आहे. सरकारमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत. काहींना सरकार पाडण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. चे कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत, मग ते सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात,'' असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी आज भाजपचे नाव न घेता लगावला.

गुढीपाडवा मुहूर्तावर मुंबई येथील वडाळा परिसरातील वस्तू आणि सेवा कर भवन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. या वेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. प्रमुख्याने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात मोठ्या प्रमाणावर दुरावा आल्याचे विरोधकांकडून सांगितले जाते. यावर ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. महाविकासआघाडी सरकार घट्ट आहे. आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्रच आहोत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असे ठाकरे म्हणाले.

 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
अजितदादा, जिथे तुम्ही आहात, तिथे मला येण्याची गरज नाही!

मुख्यमंत्री म्हणाले, ''महाराष्ट्राची बदनामी करण्याचे सध्या कारस्थान सुरु आहे. त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका,'' ''अजितदादा जिथे तुम्ही स्वतः आहात तिथे मला येण्याची गरज नाही कारण आपण एकत्र आहोत,'' असे सांगत ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या कामाचं कैातुक केलं.

 Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
देशमुख-वाझेंना सीबीआय घेणार ताब्यात ; अडचणी वाढणार!

''कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्रचा वाटा मोठा आहे. जे बजबजपुरी करीत आहेत, त्यांना सांगू इच्छितो कि महाराष्ट्राला धक्का लागलंय तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का लागेल. मला राजकारण वर बोलायचं नव्हते पण बोलावं लागते. आम्ही नुसते कष्ट करत आहोत, पण तरीही ते बदनामी करीत आहेत. पण त्या बदनामीला छेद देऊन आम्ही काम करू,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com