Health Minister Tanaji Sawant Sarkarnama
मुंबई

Thane Hospital News: ठाण्यातील 17 रुग्णांच्या मृत्यूची आरोग्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; दोन दिवसांत कारवाईचे आश्वासन

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Thane News: ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली. या रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आता विरोधक आक्रमक झाले असून सरकारला जाब विचारत आहेत.

या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर देखील प्रचंड टीका होत असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अहवाल दोन दिवसांत आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

"कळवा रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती ठाण्याच्या आयुक्तांकडून आम्ही घेत आहोत. रुग्णांच्या जिवाशी होणारी हेळसांड सहन केली जाणार नाही. या रुग्णांचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला, याचा अहवाल दोन दिवसांत येईल, त्यानंतर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले का?, हे देखील तपासण्यात येणार आहे", असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

"घटना ठाण्यात घडली की, गडचिरोलीला, यामध्ये कोणीही पडू नये. सर्वच महाराष्ट्राचे नागरिक असून सरकारची जबाबदारी आहे. आम्ही सरकार म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आम्ही करू", असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, घडलेल्या घटनेतील एकूण 17 रुग्णांपैकी 12 रुग्ण आयसीयूमध्ये, 2 सामान्य वॉर्डमध्ये तर 2 अपघातग्रस्त आणि एक बालरोग वॉर्डमध्ये दाखल होते.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT