Sanjay Raut Attack Eknath Shinde : आणखी किती दिवस आराम करणार ? मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर राऊतांचे टीकास्त्र

Maharashtra Politics : राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झालात की..
Sanjay Raut On Eknath Shinde
Sanjay Raut On Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : "उद्धव ठाकरेंचे आजारपण काढणारे, उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून त्यांच्यावर नेहमी टीका करणारे एकनाथ शिंदे आता किती दिवस आराम करणार? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

दोन दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी (जि.सातारा) मुक्कामाला आहे, त्यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते शनिवारी पुण्यात झालेल्या चांदणी चौक पुलाच्या उद्धघाटनाला अनुउपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आजारावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Sanjay Raut On Eknath Shinde
Sharad Pawars Beed Meeting : धनंजय मुंडेंच्या होमपीचमध्ये शरद पवारांची सभा का ? रोहित पवारांनी सांगितले कारण...

"एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली असे समजते. पण, उद्धव ठाकरेंवर आजारपणावरून टीका करणारे आता किती दिवसापासून आराम करीत आहेत. तुम्ही राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झालात की आराम करण्यासाठी?" अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका केली आहे.

Sanjay Raut On Eknath Shinde
Yashomati Thakur on Sambhaji Bhide : भिडेंना अटक करा, यशोमती ठाकूर आक्रमक ; स्वातंत्र्य दिनी भगवा रॅली...

भाजप-शिवसेना युती कशामुळे तुटली, यावर राऊत म्हणाले, "भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला होता. त्यामुळे युती तुटली. आता त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, असे उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरे बोलायला हवे,"

"महाराष्ट्राच्या कर्तबगार, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. केंद्राकडून, दिल्लीकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान होत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी तरी शिंदेंनी तोंड उघडायला हवे होते," असे राऊत म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com