Kalwa Hospital News : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावले: नातेवाईक संतप्त

Thane Kalwa Hospital : या रुग्णालयातील ढिसाळ कारभार वारंवार समोर येऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
Thane Kalwa Hospital :
Thane Kalwa Hospital : Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या रुग्णालयातील ढिसाळ कारभार वारंवार समोर येऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. इतकेच नव्हे तर रूग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Thane Kalwa Hospital :
Rohit Pawar In Marathwada : रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर; पक्षाच्या पडझडीनंतर संघटना बांधणीवर कसा देणार जोर ?

काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी उपचार सुरू असलेल्या पाच रुग्णांचा अचानक मृत्यू झाला, त्यात काल पुन्हा १७ रुग्ण दगावल्याने या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल संतप्त नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. (Thane News)

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या प्रकार गेल्या दोन दिवसांपासून समोर येत आहेत.त्यातच एकाच रात्रीत या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या १४ रुग्णांचा आणि जनरल वॉर्डमधील उपचार सुरु असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ सुरू केला. (Thane Politics)

Thane Kalwa Hospital :
Nagpur BJP News : कार्यालये बंद करून आराम करणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपने फटकारले, दिला ‘हा’ इशारा !

दोनच दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी रुग्णालयात आपल्या रुग्णाला व्यवस्थित उपचान न मिळाल्याने पाच रुग्ण दगावल्या आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केली होता. त्यातच आणखी १७ रुग्णांच्या मृत्यूमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांना तपसण्यासाठी येत नाहीत, रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नसल्याता आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. रुग्णांच्या नातेवाईीकांनीही आव्हाडांसमोर रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराचा पाढा वाचला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com