MLA Disqualification Hearing Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case Hearing : सर्व ३४ याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या; ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाचा विरोध

Vijaykumar Dudhale

Mumbai News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त निकम यांनी सर्व ३४ याचिकांवरील सुनावणी एकत्रित घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्याला शिंदे गटाचे वकील अनिलसिंह साखरे यांनी विरोध केला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुढची सुनावणी १३ ऑक्टोबरला ठेवली आहे. (hear all the 34 petitions together; Shinde group's opposition to Thackeray group's demand)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची मुंबईतील विधान भवनात सुनावणी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील अनिलसिंह साखरे विधान भवनातील सुनावणी बाजू मांडली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, प्रकाश पाफत्रेकर हे विधान भवनात उपस्थित होते.

ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले होते, त्यात कागदपत्रांची पुन्हा छाननी करण्यात यावी. तसेच दोन्ही गटाला कागदपत्रं देण्यात यावीत, असे मागील सुनावणीच्या वेळी सांगितले होते. सुमारे ३४ याचिकांवरील सुनावणी पुन्हा एकदा एकत्रित घेण्यात यावी, त्यामुळे वेळ वाचेल आणि लवकरात लवकर निर्णय होईल, अशी मागणीही कामत यांनी केली होती.

दरम्यान, नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात होताच ‘सर्व ३४ याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी,’ अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. मात्र, त्यास शिंदे गटाकडून विरोध दर्शविण्यात आलेला आहे. वैयक्तीकरित्या आमदारांचे अपात्रतेसंदर्भात म्हणणं जाणून घेतलं पाहिजे. या सर्व याचिकांवर स्वतंत्ररित्या सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.

या सर्व ३४ याचिकांवर स्वतंत्ररित्या सुनावणी घेण्यासाठी वेळ लागू शकतो. तसेच, या प्रकरणाच्या निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांनी आजच सांगावं. या प्रकरणावरील निर्णय देण्यासाठी किती वेळ लागू शकतो, याबाबतचे वेळापत्रक जाहीर करावं, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.

दरम्यान, दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढची सुनावणी ही १३ आक्टोबर रोजी ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT