Shashikant Shinde To Pawar : शरद पवारांवरील निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही; शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका

Satara politics : जे निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेले आहेत. त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये.
Shashikant Shinde-Sharad Pawar
Shashikant Shinde-Sharad Pawar Sarkarnama

Satara News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील निष्ठेपायी आम्ही अपात्र झालो तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणात आलो आणि त्यांच्यामुळेच पदं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले. (I don't care if I am disqualified due to Sharad Pawar's loyalty : Shashikant Shinde)

‘आम्ही अपात्र होणार, अशी स्वप्ने बघणारेच अपात्र होतील,’ अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी ‘पवारांवरील निष्ठेपायी अपात्र ठरलो तरी पर्वा नाही’ अशी भूमिका मांडली आहे.

Shashikant Shinde-Sharad Pawar
Vaidyanath Sugar Factory : पवारांकडून मुंडेंच्या कारखान्याला मदत; मग अमित शाहांकडून हात आखडता का?

शशिकांत शिंदे म्हणाले की, जे निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेले आहेत. त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करू नये. त्यांनी त्यांच्या अपात्रतेची काळजी करावी. न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणीत ते शंभर टक्के अपात्र होणार आहेत. दुर्दैवाने ते अपात्र झाले नाही तर जनतेच्या दरबारात निवडणुकीत ते अपात्र ठरतील, हे मी आज जाहीररित्या सांगतो.

आमदार महेश शिंदे यांनी माझ्या अपात्रतेची काळजी करू नये. कारण आम्ही निष्ठावंत आहोत. त्या निष्ठेपायीच आमची त्याग करण्याची तयारी आहे. परंतु आपण पक्ष, निष्ठा बाजूला ठेवून निवडणुकीच्या माध्यमातून ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले. त्या जनतेशी गद्दारी करून खोक्यांसाठी आपण तिथं गेलेले आहात, असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी आमदार शिंदेंना लगावला.

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रचंड ताकदीने उतरेल आणि तुम्हाला निश्चितपणे पराभूत करेल. पण, ती वेळ येणार नाही. विधानसभा अध्यक्ष आणि न्यायालय आपल्याला निश्चितपणे अपात्र ठरवतील, याची मला खात्री आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

Shashikant Shinde-Sharad Pawar
Ramesh Kadam in Mohol : रमेश कदमांची मोहोळमध्ये क्रेझ कायम; मतदारसंघात ८ वर्षांनंतर आलेल्या माजी आमदारांचे जंगी स्वागत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com