Mumbai University Senate Election  Sarkarnama
मुंबई

Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाची निवडणूक ठरल्याप्रमाणेच होणार ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका!

Mayur Ratnaparkhe

Mumbai University Senate Election 2024 News : मुंबई विद्यापीठाच्या दहा नोंदणीकृत पदवीधर जागांसाठी उद्या म्हणजेच 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिलेला आहे. या आधी काल ही निवडणूक ऐनवेळी पुढे ढकलली गेली होती. यानंतर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याविरोधात धाव घेतली होती.

प्राप्त माहितीनुसार उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठास(Mumbai University) फटाकरले असून, उद्याच निवडणूक घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे आता उद्याच ही निवडणूक मुंबई विद्यापीठास घ्यावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा दिला मिळाला आहे.

या आधी दोनवेळा ही निवडणूक स्थगिती केली गेली होती. तर निवडणुकीच्या एक दिवस आधीच म्हणजे काल या निवडणुकीस स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

या निवडणुकीसाठी ठाकरे गट युवासेना विरुद्ध अभाविप यांच्यासह मनसे(MNS)नेही कंबर कसलेली आहे. मुंबई विद्यापीठाची 10 जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या 13,406 इतकी आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत युवासेना आणि अभाविप यांच्यासह मनसेही उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. तसेच युवासेना आणि अभाविपकडून सर्वच्या सर्व दहा जागांवर उमेदवारही जाहीर केले गेले आहेत. त्यामुळे युवासेना विरुद्ध अभाविप अशीच लढत होण्याची शक्यता दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT