Mumbai University Senate Election 2024 : मोठी बातमी! आदित्य ठाकरेंना झटका; मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा स्थगित

Senate Election News : मुंबई विद्यापीठाची 10 जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात उतरवले होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती.
Mumbai University
Mumbai UniversitySarkarnama
Published on
Updated on

Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधर जागांसाठी येत्या 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार होती. या सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गट युवासेना विरुद्ध अभाविप यांच्यासह मनसेनेही कंबर कसली होती.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, आता राज्य सरकारने ठाकरेंना मोठा झटका देताना काही तासांवर आलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाल्यामुळे सिनेट निवडणुकीला स्थगिती देत असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली आहे.

मुंबई विद्यापीठाची 10 जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार मैदानात उतरवले होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या 13,406 इतकी आहेत.मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी सर्वतयारी करण्यात आली होती.

मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत युवासेना आणि अभाविप यांच्यासह मनसेही उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. तसेच युवासेना आणि अभाविपकडून सर्वच्या सर्व दहा जागांवर उमेदवारही जाहीर केले होते. त्यामुळे युवासेना विरुद्ध अभाविप अशीच लढत होण्याची शक्यता होती. आहे. उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले होते.

Mumbai University
Ashwini Jagtap : 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा, भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या,'पक्ष सोडून जाणं...'

अशा परिस्थितीत मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकच स्थगित झाल्यामुळे उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तसेच यावरुन महायुती सरकारवर शिवसेना ठाकरे गट टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे.

'...पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला!'

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. यात पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला... एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2 दिवसांवर असताना स्थागित करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे.

तसेच निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील. अशा घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावसं वाटतं की, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही... सूर्योदय होणार म्हणजे होणारच असंही शरद पवार गट ट्विटमध्ये म्हणाला आहे.

Mumbai University
Shivsena-BJP Yuti : भाजपने माझा प्रस्ताव मान्य केला असता तर युती तुटली नसती; केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com