Mumbai News, 21 Sep : मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) सिनेट निवडणूक राज्य शासनाकडून पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य शासनाचा पुढील आदेश मिळेपर्यंत ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केलं आहे.
निवडणुकीला केवळ एक दिवस उरला असताना ही निवडणूक पुढे ढकल्यामुळे विरोधकांसह विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकीला सामोरे जातात. पण इथे सुशिक्षित तरुण वर्ग मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ एक दिशादर्शक म्हणून काम करतं. त्यामुळे ही निवडणूक आपण हरणार हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
तर मुंबई विद्यापीठाच्या ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यापीठाला दिशा देणारा आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेटची निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकलली. आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत म्हणाले, "शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरली असून आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकत आहे हे दिसून आल्यावर, डरपोक शिंदे सरकारने, डरपोक हा शब्द यासाठी वापरत आहे की, त्यांच्यात कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याचे हिंमत नाही हे सातत्याने पाहिलं आहे.
जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकीला सामोरे जातात. पण इथे सुशिक्षित तरुणवर्ग मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ एक दिशादर्शक म्हणून काम करते. त्यामुळे ही निवडणूक आपण हरतो आहे हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली.
दरम्यान, एक देश एक निवडणूक या योजनेची ढोल वाजवतात पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची त्यांची हिम्मत नाही पुन्हा रद्द झाली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Election) घेण्याची हिंमत नाही, मग तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात?
ज्या निवडणुका तुम्ही पैशाच्या जोरावर जिंकू शकता 'ईव्हीएम'चा गैरवापर करून जिंकू शकता, पोलिस नियंत्रणाचा वापर करून जिंकू शकता अशाच निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात. पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाहीत, जिथे ईव्हीएम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिम्मत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं." अशा शब्दात राऊतांनी केंद्रासह राज्य सरकारचा समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.