Hindustani Bhau sarkarnama
मुंबई

हिंदुस्तानी भाऊला मोठा धक्का! विद्यार्थांना चिथावणी देणे पडले महागात

सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा (SSC Exam) रद्द करण्यासाठी सोमवारी (३१ जानेवारी) राज्याच्या विविध शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक करुन न्यायलयासमोर हजर केले, असता त्याला तीन दिवसांची पोलिस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. हिंदुस्थानी भाऊने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केले होते. याच गुन्ह्याखाली त्याला मंगळवारी सकाळी धारावी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले होते.

आंदोलनामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाल्याबद्दल हिंदुस्थानी भाऊ आणि त्यांच्या वतीने आपण विनाअट न्यायालयात माफी मागितली. तसेच तसेच पोलिसांना काही चौकशी करायची असेल तर पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी आम्हीच केल्याचे हिंदुस्थानी भाऊचे वकील महेश मुळ्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाला विरोध होऊ लागला. हिंदुस्थानी भाऊनेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना दिली होती. मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने जाहीर केले होते. रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT