हिंदुस्थानी भाऊचा जळगावातही डंका; शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओद्वारे यासाठी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी रस्त्यावर उतरणार अशा इशारा दिला होता.
Student movement
Student movementsarkarnama

जळगाव : हिंदुस्थानी भाऊचा (Hindustani Bhau) जळगावातही डंका वाजला, बारावीच्या परिक्षा (Ssc Exam) ऑनलाईन व्हाव्यात यासाठी शेकडो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर जमले होते. पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठविले.

हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओद्वारे यासाठी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी रस्त्यावर उतरणार अशा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर आले होते. जळगावातही (Jalgaon) शेकडोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

Student movement
बोर्ड परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर: वर्षा गायकवाड म्हणाल्या...

पोलिसांनीताबडतोब दखल घेवून सामंजस्यांची भूमिका घेत विद्यार्थ्यांना समजाविले. गोंधळ न करता त्यांनी मागणीचे निवेदन द्यावे, तसेच गर्दी न करता घरी जावे असे अवाहन केले. तसेच कारवाईचा ईशाराही दिला. कोणत्याही अवाहनाशिवाय हे सर्व विद्यार्थी हे अचानक पणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेकडोंच्या संख्येने जमल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी सयंमाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना पागंविले.

Student movement
महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटवणारा 'हिंदुस्थानी भाऊ' आहे तरी कोण?

विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाई म्हणून हे पात्र सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. त्याने 26 जानेवारी रोजी यासाठीचा व्हिडीओ जारी करून 31 जानेवारीला आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. यामुळे महाराष्ट्रभर आंदोलन पेटले. त्याला यूट्यूब YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईटवर (Social Media) मोठ्या प्रमाणात फॅालोअर्स आहेत. विकास पाठक सोशल मीडियावर विविध नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ प्रसिद्ध करत असतो. नेते बोलत असतानाचे त्यांचे एक दोन मिनिटांचे व्हिडीओ कट करुन त्यामध्ये 'रुको जरा' 'आगे देखो' सबर करो...असे शब्दप्रयोग करतो. हे डायलॅाग अनेकदा आपण ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com