Cabinet Expansion : शिंदे सरकारचा अनेक दिवसापासून रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. सकाळी राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ आणि भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला.
या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुणाला कोणते खाते मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार यांची उत्सुता आहे. यामध्ये सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रिपदाची यादी फायनल झाली आहे. सर्वात महत्वाची दोन खाती गृह आणि अर्थ हे फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. नगरविकास खाते मुख्यमंत्री स्वत: कडे ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशी असतील संभाव्य खाती...
1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)
2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, सहकार
4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन
5) चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम
6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास
7) गिरीश महाजन - जलसंपदा
8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
9) दादा भुसे- कृषी
10) संजय राठोड- ग्राम विकास
11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय
12) संदीपान भुमरे- रोजगार हमी
13) उदय सामंत - उद्योग
14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
18) अतुल सावे - आरोग्य
19) शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क
20) मंगलप्रभात लोढा- विधी व न्याय
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.