राठोडांच्या राजीनाम्यासाठी आकाशपाताळ एक केलेले फडणवीसच त्यांचे राखणदार... म्हणाले...

Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sanjay Rathod : एकनाथ शिंदेंकडून संजय राठोडांना क्लीनचीट
Devendra Fadnavis| Sanjay Rathod
Devendra Fadnavis| Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नावावरुन सध्या मोठा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपमधूनही (BJP) राठोड यांच्या नावाला विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांवरील आरोपांची ट्विटरवर एक यादीच प्रसिद्ध केली आहे. यात संजय राठोड यांच्या नावाच समावेश असून अतुल सावे, सुरेश खाडे, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत यांच्याही नावांचा आणि आरोपांचा उल्लेख आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

या वादावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांची पाठराखण केली. ते म्हणाले, ज्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली जेलमध्ये आहेत आणि अनेक नेत्यांवर ठिकाणी खटले सुरू आहेत, अशा पक्षाला यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? त्यांनी अगोदर आरसा पाहावा आणि नंतर अशा प्रकारचे ट्वीट करावे,” असा टोला फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Devendra Fadnavis| Sanjay Rathod
अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

मुख्यमंत्री शिंदे यांनीही राठोड यांना क्लिनचीट दिली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री असताना पोलिसांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्यामुळे त्यांचा या मंत्रिमंडळात समावेश केलेला आहे. पोलिसांनी तपास केला होता. त्यामध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही, त्यामुळे त्यांना क्लिनचिट दिलेली आहे. यावर आणखी कोणाचे काही मत असेल तर ते नक्की ऐकून घेतले जातील. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

संजय राठोड यांच्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही संशयातील व्यक्ती मंत्रिमंडळात नसत्या तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर संबंधित पत्रकाराने कोणाचे नाव तुम्ही घेता आहात, असा प्रश्न विचारला. त्यावर ते नाव तुला माहीत, असे उत्तर पवारांनी दिले. राठोड यांचे नाव घेण्याचे अजितदादांनी टाळले. इतर मंत्र्यांना देखील संजय राठोड यांच्या नावाबद्दल विचारले असता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगत त्यावर भाष्य टाळले.

Devendra Fadnavis| Sanjay Rathod
Sanjay Rathod : पोलिसांकडून क्लीनचिट म्हणूनच संजय राठोड मंत्रिमंडळात....

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ''पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे,'' असे ट्विट करत वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, हेमंत देसाई यांनीही राठोड यांच्या मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली आहे. '' ज्या संजय राठोड यांच्यावर देवेंद्रजी, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ प्रभृतींनी सडकून टीका केली होती आणि त्यांचा ठाकरे सरकारमधून राजीनामा मागितला होता, ते राठोड आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवनिष्कलंक संजय राठोड आणि संस्कारी पक्षाचा विजय असो,'' असा टोला त्यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com