Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा 'तो' शब्द फडणवीसांच्या जिव्हारी; आक्रमक होत दिला थेट इशारा!

Devendra Fadnavis News : चाणक्यांचे उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray News : ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकारानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर परखड शब्दांत निशाणा साधला होता. ''राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय'', असा उल्लेख ठाकरेंनी केला होता. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतो आहे. मात्र, त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ''अडिच वर्षांच्या त्यांचा कारभार पाहिल्यानंतर फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्राला माहित आहे. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर राजीनाम घेऊ शकले नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यांना फ्रस्ट्रेशन आले आहे,'' अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

''मोदींचे फोटो लावून निवडणून येतात, आणि विरोधकांची लाळ घोटतात, त्यामुळे खरा फडतूस कोण, त्यांच्यापेक्षा खालची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे. पण मी तसे बोलणार नाही. मी गृहमंत्री असल्यामुळे अनेकांची अडचण होत आहे. मी तुमच्या कृपेने गृहमंत्री झालेलो नाही, जो-जो चुकीचे काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही,'' अशा इशाराच फडणवीस यांनी यावेळी दिली.

ठाण्यात घडलेल्या घटनेचे राजकारण कुणी करुन नये. आमचे सरकार त्या घटनेची चौकशी करेल. चाणक्या असे म्हणाले होते, राज्यातील चोर, डाकू, लुटेरे, राज्याच्या विरोधात बोलले की समजावे राज्या चांगले काम करत आहे. मी राजा नाही. मात्र, चाणक्य जे बोलले ते खरे होत आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT