Uddhav Thackeray News : 'यांची गुंडगिरी महाराष्ट्रातून उखडून फेकू देवू शकतो पण...' ; रोशनी शिंदेप्रकरणी ठाकरेंचा कडक इशारा..

Roshani Shinde News : फडतूस गृहमंतत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही...
Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
Roshani Shinde News : Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack : Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संतप्त होऊन, शिंदे गट व भाजपला इशारा दिला आहे.

Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
Satara Market Committee : आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाविरोधात स्वाभिमानीसह सर्वपक्षीय एकवटले...

ठाकरे म्हणाले, "सरकारचं ओळखंच नपुसंक असेल तर कोणाकडून काय अपेक्षा करायची, ठाण्याची ओळख शिवसेनेचं ठाणं, धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं, सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे. ती ओळख पुसून गुंडाचं ठाणं अशी ओळख करण्याचा प्रयत्न केलं जात आहे. महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडगिरी करायला लागल्या, तर ठाण्याचं काय होणार? हा एक प्रश्न आहे."

"यांची गुंडगिरी महाराष्ट्रातून उकडून फेकून देवू शकतो. मी ठाण्याच्या आयुक्तालय गेलो तर तिथे आय़ुक्तच नाहीत. रोशनी शिंदेंनी याबाबत पत्र लिहले आहे. गुंड महिलांनी हल्ला केला त्यांच्याविरोधात तक्रार अजूनही नोंदवून घेतलेलं नाही," असेही ठाकरे म्हणाले.

Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
Sandipan Bhumre News : उद्धवसाहेबांची लय मोठी सभा झाली, साहेब आपल्याला बी घ्यावं लागलं ; कार्यकर्त्याचा हट्ट्..

"आयुक्त काय सरकारचं घटक म्हणून काम करत आहेत का अशी शंका येते. फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लालघोटेपणा करणारा नुसती फडणवीसी करणारा एक माणूस, गृहमंत्री म्हणून मिरवतोय. यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे. ठाण्यातल्या एका पत्रकाराला धमकी देण्यात आली, रोशनीकडून माफीचा व्हिडीओ करण्यात आला. फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहण्याचा काहीच अधिकार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com