Honey trap case Thane Sarkarnama
मुंबई

Honey Trap Case Thane : हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत; राऊतांच्या थेट संकेतानं मोठं वादळ उभं राहणार?

Sanjay Raut Honey Trap Case Reaches Thane Slams Eknath Shinde Shiv Sena : राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅपप्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत पोचली आहेत, याचा दावा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashta Honey Trap Scandal : राज्यात हनी ट्रॅपचं वादळ घोंगावत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत आज मुंबईत पत्रकार परिषदेत, मोठे दावे केले. चार मंत्र्यांमध्ये भाजपचे दोन, 16 ते 17 आमदार अन् चार तरुण खासदारांचा समावेश असल्याचा दावा करत गौप्यस्फोट केला.

याची पाळंमुळं ठाण्यापर्यंत पोचल्याचं सांगून खासदार संजय राऊत आणखी खळबळ उडवून दिली. ठाणे जिल्हा शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ओळखला जातो. त्यामुळे राऊत यांचा थेट पण, नेमका इशारा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उभं राहण्याचे संकेत दिले.

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. 'प्रताप सरनाईक अजून झोपेत आहेत. त्यांचे कौतुक आहे की, त्यांनी खूप धाडसी विधान केलं. प्रताप सरनाईक यांनी हनी ट्रॅपवर बोलावं. हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत कशी पोचली आहेत, त्याचा त्यांनी अभ्यास करावा', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

'एकनाथ शिंदे यांची शिवसेना भविष्यात सत्तेत असेल की नाही, हे सांगता येत नाही. कारण ते ओझं झालं आहे. केंद्राला आणि महाराष्ट्राला सुद्धा. यांच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. भाजप (BJP) देखील बदनाम होत आहे. भाजप पण धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही. किंवा मोगऱ्यासारखं सुगंधी फूल नाही. ते पण दुर्गंधी आहेत', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

'हनी ट्रॅपचं प्रकरण विधिमंडळात गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीची घोषणा करायला होती. पण त्यांनी उडवून लावलं. तु्म्ही तुमच्या लोकांना वाचवत आहात. तुम्हाला माहित आहेत, या प्रकरणात काय आहे. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा काढला आहे. माध्यमांमध्ये चर्चा आहे. पोलिसांचा रिपोर्ट आहे. हे घाशीराम कोतवालांचं राज्य आहे', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

'पेशवांना घाशीराम कोतवाल ज्यापद्धतीने चालवत होता. त्याचपद्धतीने राज्याचा कारभार सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी मुलाखत घ्या. त्यांच्याकडून काही राहिल्यास मी सांगतो, असे सांगून हनी ट्रॅपचे प्रकरणात चार मंत्र्‍यांमध्ये दोन भाजपचे आहेत. 16 ते 17 आमदार आणि चार तरुण खासदार आहेत. हे कसे सुरतला पळून गेले', यावर संजय राऊत जोरदार हल्ला चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT