Retirement Age CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Retirement Age : सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याची मागणी किती व्यवहार्य आहे?

CM Eknath Shinde : सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचा दावा अधिकारी महासंघाने केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra government Retirement Age : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न गाजत आहे. असे असतानाच आता सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणी सुरू आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे.

तर दुसरीकडे सेवानिवृत्तीचे ५८ चे वय ६० करण्याचा निर्णय घेवून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नये, असं आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केलं आहे. तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांची जुनी पेन्शन ऐवजी वय वाढवण्याची मागणी फेटाळून लावावी, अशा मागणीचे पत्रच मुख्यमंत्र्यांना हेरंब कुलकर्णी यांनी लिहिले आहे.

निवृत्तीचे वय वाढवल्याने नवीन नोकरभरती लांबेल हा समज अनाठायी असून उलट निवृत्तीचे वय साठ केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचतील, असं कर्मचारी संघटनेच म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे ५८ चे वय ६० करण्याची मागणी किती व्यवहार्य आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील बेरोजगारी वाढेल, त्यामुळे या मागणीला विरोधही करण्यात येत आहे. तसेच उलट सेवानिवृत्तीचे ५८ चे वय ६० न करता ५५ करावे, अशी मागणीही राज्याभरातून सुरु आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अधिकारी संघटनेचे सर्व दावे खोडून काढले आहेत. दरवर्षी ३ टक्के कर्मचारी निवृत्त होतात. १६ लाख कर्मचाऱ्यांत दरवर्षी ४८ हजार नोकऱ्या निर्माण होतात. जर निवृत्तीवय दोन वर्षाने वाढवले तर ९६००० म्हणजे १ लाख नोकऱ्या निर्माण होतात त्या तरुणांना मिळणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवृतीला आलेल्या कर्मचार्‍याचे वेतन ५० हजारापेक्षा जास्त असते. त्या रकमेत किमान ८ नवे कर्मचारी नेमता येतील, त्यामुळे लवकर निवृत्ती शासनाच्या फायद्याची आहे, असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याबाबत सरकार काय भूमीका घेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT