Satara Congress : काँग्रेसच्या पोस्ट कार्ड कम्पेनिंगला प्रारंभ; मोदींना एक लाख पत्रे पाठवणार...

Dr. Suresh Jadhav डॉ. सुरेश जाधव म्हणाले, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याची सुरवात आज सातारा काँग्रेस भवनातून करण्यात आला.
Congress Andolan
Congress AndolanPramod Ingale, Satara
Published on
Updated on

Satara News : ‘मोदानी हटाओ, देश बचाओ, लोकशाही बचाओ’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने Congress पाठविण्यास सुरवात केली. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव Suresh Jadhav यांच्या नेतृत्वाखाली या पोस्ट कार्ड कम्पेनिंगची सुरूवात झाली.

यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य अजित पाटील चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ. छायदेवी घोरपडे, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशा खान, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, मनोजकुमार तपासे, सुषमा राजे घोरपडे, रजिया शेख, मालन परळकर आदींनी आज टपाल कार्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले की, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याची सुरवात आज सातारा काँग्रेस भवनातून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, २०१४ च्या निवडणुकीआधी आणि नंतरही विविध आश्वासने दिली पण त्याची पुर्तता केलेली नाही. या दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर करावी.

Congress Andolan
Congress News : मल्लिकार्जून खर्गेंचा पराभव घडविण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नेत्यालाच काँग्रेसने दिले तिकिट!

अदानीच्या आर्थिक भानगड्यांची आपण जेपीसीमार्फत चौकशी कधी करणार, केंद्र सरकार अदानीच्या जेपीसीच्याचौकशीपासून पळ का काढत आहे, एसबीआय आणि एलआयसीला अदानीच्या आर्थिक भानगड्यांमुळे जो धोका निर्माण झाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे.

Congress Andolan
Satara News : सावरकरांबाबत भाजपच्या कृतीच्या निषेधार्थ लक्ष्मण माने यांचे साताऱ्यात उपोषण

निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार, अच्छे दिन गौतम व विनोद अदानी यांना आले आहेत सर्वसामान्यांना अच्छे दिन कधी येणार, स्वीस बॅंकातील कथित काळा पैसा परत आणून प्रति नागरीक १५ लाख रूपये प्रमाणे वाटणार होता त्याचे काय झाले, आदी प्रश्नांचा समावेश आहे.

Congress Andolan
Prithviraj Chavan : आमदार, खासदार, राज्यमंत्री ते मुख्यमंत्री... पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकिय प्रवास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com