-अय्याज मुल्ला
Waduj Savarkar Gaurav Yatra : आम्ही स्वातंत्र्यवीरांचा, हुतात्म्यांचा, हिंदू देवीदेवतांचा अपमान कधीच सहन करणार नाही. प्रखर हिंदूत्ववादी सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभे आयुष्य वेचले होते. मात्र सत्तेसाठी लाचार झालेली कॉंग्रेस Congress आणि ठाकरे शिवसेना Shivsena हिंदूत्व विसरुन त्यांचा अपमान करत आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच त्यांचे हे उद्योग सुरु असल्याचा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी केला.
वडूज (ता. खटाव) येथे भाजपच्या वतीने आयोजित सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते. यावेळी माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, दोन्ही तालुक्यातील पक्षाचे आजी, माजी महिला, पुरुष पदाधिकारी, आणि सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावरकर गौरव यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
जयकुमार गोरे म्हणाले, प्रखर हिंदूत्ववादी सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. राजकीय स्वार्थासाठी त्यांचा अपमान करण्याचे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधींकडून सुरु आहे. सावरकरांचे नाव घेण्यासाठी मातृभूमीबद्दल प्रेम लागते, ते प्रेम राहुल गांधींकडे नाही.
ज्या सावरकरांच्या विचारांवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या फोटोला थोबाडीत मारली होती. मात्र, त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र सत्तेसाठी लाचार होवून सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
राहुल गांधींना सडेतोड उत्तर द्यायची धमक त्यात नाही. महाराष्ट्रात येवून सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या पदयात्रेत अदित्य ठाकरे, संजय राऊत सहभागी होतात. यावरुन शिवसेना हिंदूत्व विसरली असल्याचे दिसत आहे. भाजप हुतात्म्यांचा, स्वातंत्रवीरांचा अपमान कधीच सहन करणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.