Murlidhar Mohol-Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Death : अजितदादांसोबत विमानात किती लोक होते? केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिले हे उत्तर...

Murlidhar Mohol Statement : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्राथमिकदृष्ट्या दृश्यमानतेची अडचण कारण असू शकते असे सांगत अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होतील असे म्हटले.

Vijaykumar Dudhale

New Delhi, 02 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात किती लोकं होती? अपघात कशामुळे झाला? तो अपघात होता की घातपात असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांवर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले आहे. अजितदादांसोबत विमानात किती लोकं होती, हे चौकशीतून समोर येईल. पण, प्राथमिकदृष्ट्या व्हिजिब्लिटीचा प्रॉब्लेम दिसत असून व्हिजिब्लिटीमुळे पायलटला धावपट्टी दिसली नसावी, असा अंदाज मंत्री मोहोळ यांनी दर्शविल आहे. पण हे सांगताना त्यांनी चौकशीकडे बोट दाखवले आहे.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत भाष्य केले आहे. विमानात सहा लोकं होती, तर पाच लोकांचेच मृतदेह कसे मिळाले?, या अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, विमान अपघात तपास ब्यूरोची (एएआयबी) टीम बारामतीत पोचल्यानंतर सर्व माहिती गोळा करत आहे. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून सर्व गोष्टी समोर येणार आहेत. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आपण निष्कर्षांपर्यत पोचू शकतो.

अजितदादांसोबत विमानात किती प्रवासी होते, हे चौकशी समितीतून निष्पन्न होईल. प्रवाशांची यादीबाबतही मुरलीधर मोहोळ (murlidhar Mohol ) यांनी थेट एएआयबी, हवाई वाहतूक मंत्रालय याचा बारामती विमानतळाशी थेट संबंध नव्हता. एक एव्हिएशन क्लब तो विमानतळ चालवत होता. गेली दहा ते पंधरा वर्षांपासून बारामतीची एअर स्ट्रीप वापरात होती.

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा हे अनेका वेळा या धावपट्टीवर उतरले आहेत, तेथून टेक ऑफ केलेले आहे. हजारो लोकं तिथून आलेली आहेत, गेलेली आहेत. पण झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोहोळ म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत प्राथमिकदृष्ट्या सकृतदर्शनी जे दिसत आहे, त्यात व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसत आहे. व्हिजिबिलिटीमुळे पायलटला धावपट्टी दिसली नसावी. हाही विषय असू शकतो. पण जर तर नको, म्हणून चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस यांनी त्यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. राज्य सरकारने सीआयडी चौकशी लावली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे बारा महिने चोवीस तास राजकारण करतात. पण ती वेळ आता नाही. आपण किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतो, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. एक कर्तृत्वान नेता, उपमुख्यमंत्री आपल्यातून गेला आहे. प्रत्येकाच्या मनात दुःखाची भावना आहे. राऊतांची समाजात काही विश्वासर्हता नाही, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, असा सल्लाही मोहोळ यंनी दिला.

ते म्हणाले, ज्यांच्या मनात शंका आहेत, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर डीजीसीआय आणि एएआयबीची पथके बारामतीत पोचली आहेत. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, त्यातून अपघाताचे खरे कारण पुढे येईल. प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर आता उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT