flight Cancellation Crisis : विमान वाहतूक विस्कळीत, 'इंडिगो'वर कारवाई होणार..., मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले

Murlidhar Mohol Warns IndiGo : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमान वाहतूक सेवा देणाऱ्या इंडिगोवर कारवाईचा इशारा दिला आहे. इंडिगोच्या सीईओंना नोटीस दिली असल्याचे त्यांनी म्हटले.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत विमान व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे.अनेक फ्लाईट कॅन्सल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर काही विमान कंपन्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत विमान तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवलेल्या आहेत. या देशांतर्गत विमान वाहतुकीचा खेळखंडोबा नेमका कोणी केला आणि सरकारचं कोणतं धोरण या खेळखंडोबाला कारणीभूत ठरलं याबाबत केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांनी खुलासा केला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेले काही दिवस हवाई वाहतूक करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावं लागला आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये झालेल्या गोंधळामुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे. इंडिगो कंपनीने गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये ज्या तांत्रिक गोष्टी करणं आवश्यक होतं त्या त्यांनी वेळेत केला नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पायलेट असोसिएशनने पायलट यांचा जे दहा तासाचे ड्युटीचे तास आहेत ते कमी करून आठ तासावर आणले जावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने त्याबाबतचे निर्देश देखील दिले होते.त्यानंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना तात्काळ आदेश दिले होते. की ड्युटीवर आठ तास करण्यात यावा त्यासाठी दोन टप्पे देखील या विमान वाहतूक कंपन्यांना आखून देण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत इंडिगो ने या संदर्भात कोणतेही काम केलं नाही.

त्यामुळे अचानकपणे पायलटचे ड्युटीचे तास कमी झाले आणि त्यामध्ये आधीच मनुष्यबळाची असलेली कमतरता यामुळे इंडिगो ची वाहतूक सेवा प्रभावीत झाली. इंडिगो ही देशातील 65 टक्के विमान वाहतूक सेवा पुरवत असल्याने हा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला.

Murlidhar Mohol
Mahayuti Conflict : अखेर महायुतीतील मोठ्या वादावर तोडगा निघाला : भाजपची शिवसेना, राष्ट्रवादीसोबत डील ठरली

चौकशी समिती गठीत

याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने तात्काळ दखल घेऊन इंडिगोला ही सगळी व्यवस्था पुन्हा लावण्यासाठी वेळ लागणार असल्याने जे बदल करण्याचा नियम लागू करण्यात आला होता त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच या नियमाला फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याबाबत चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली असून इंडिगो च्या सीईओंना याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली आहे.

कठोर कारवाई करणार

इतर विमान कंपन्यांनी वाढवलेल्या तिकिट दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरानुसार जास्तीत जास्त किती दर आकारला जाऊ शकतो याबाबतचे नियम करण्यात आले आहे. तसेच ज्या लोकांची विमान कॅन्सल झाली आहेत. त्यांना कोणतेही कॅन्सलेशन चार्जेस न लावता पूर्ण तिकिटाची रक्कम पुढील 48 तासांमध्ये देण्यात यावी अशी आदेश देखील दिले असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं तसंच संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा देखील त्यांनी स्पष्ट केलं.

Murlidhar Mohol
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या हट्टामुळे भाजप एकाकी : शिवसेना, राष्ट्रवादीची 'तपोवन वादात' भूमिका क्लिअर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com