

Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या आठ दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका करतानाच त्यांना सल्ला देखील दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी तटकरे म्हणाले, 'संजय राऊत यांच्या टीकेला आपण फारसे महत्त्व देत नाही, तर विजय वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी प्रथम चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर निवडून आणण्याचे आव्हान आहे. ते आव्हान पेलावे असा सल्ला तटकरे यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जनतेने मान्य केला असून, त्या निर्णयाला जनतेने पाठींबादेखील दर्शवला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी भाजपसोबत सत्तेत आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उल्लेख केलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी कुठल्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बाण्याचा असून, आमचे निर्णय आम्हीच घेतो, असेही अधोरेखित केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसापासून वातावरण चांगलेच तापले आहे. या वरून एकमेकांवर टीका केली जात असतानाच आता सुनीत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बाण्याचा असल्याचे सांगत विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.