Ramdas Athawale News Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale News : मोदींनी फोडली विकासाची हंडी, सांगा कसे होतील प्रधानमंत्री राहुल गांधी ? आठवलेंचा कवितेतून निशाणा...

उत्तम कुटे

Mumbai News : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यातील शीघ्रकवीचा प्रत्यय अनेकदा त्यांच्या भाषणातून येत असतो. संसदेतही बोलताना चारोळीतून ते हशा पिकवितात. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय दहीहंडी उत्सवात मुंबईत आला. आपल्या शीघ्रकवितेतून त्यांनी धमाल उडवून देत मुंबईकरांच्या दहीहंडीच्या हौसेलाही सलामी दिली. (Latest Marathi News)

अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे आठवले यांनीही काल मुंबईतील काही दहीहंडी मंडळांना भेटी दिल्या. पांजरापोळ, चेंबूर येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या दहीहंडीत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. 'कितीही आला पाऊस, तरी मुंबईकरांना आहे दहीहंडीची हौस' असे त्यांनी मुंबईकरांचे कौतुक करताच चेंबूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.

भाजप आणि त्यांच्या केंद्रातील एनडीए, सरकार विरोधातील पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. त्याद्वारे त्यांचे नेते भाजपसह मोदींना खास लक्ष्य करीत आहेत. हा धागा पकडून यावेळी आठवलेंनी विरोधकांना 'तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, 2024 च्या निवडणुकीत आम्ही देऊ तुम्हाला एकदाच टोला,' असा टोला देणारी काव्य ओळ म्हणताच पुन्हा हशा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सेलिब्रिटींनी हजेरी लावलेल्या भाजप आमदार राम कदमांच्या घाटकोपरच्या दहीहंडीत आठवले यांनी धमाल उडवून दिली. 'नरेद्र मोदींनी फोडली विकासाची हंडी, असे सांगत आहे गावागावातील दादी, मग सांगा कसे होतील प्रधानमंत्री राहुल गांधी,' असे ते म्हणताच घाटकोपरकरांनीही त्याला प्रतिसाद दिला. 'कदम यांच्या नावात आहे राम, मग का होणार नाही तुमचे काम' असे ते म्हणताच कदमांसह भाजपच्या पाठीराख्यांनी शिट्ट्या वाजवल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT