Ravindra Waikar Hotel Case : ठाकरे गटाचे आमदार वायकरांचे पंचतारांकित हॉटेल जमीनदोस्त होणार ? सोमय्यांचे सूचक ट्विट...

Ravindra Waikar Five Star Hotel Case Update : "पाचशे कोटींचे पंचतारांकित हॉटेल लवकरच जमीनदोस्त होणार.."
Ravindra Waikar Five Star Hotel Case : Kirit Somaiya
Ravindra Waikar Five Star Hotel Case : Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलची परवानगी रद्द करण्याविरोधात दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. आता याचिका फेटाळून लावल्याची माहिती देत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत सूचक ट्विट केले आहे.

जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्या जागेवर वायकर पंचतारांकित हॉटेल बांधत आहेत. मात्र या प्रकरणी पालिकेने काम थांबवण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाविरोधात वायकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांची ही याचिका फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

Ravindra Waikar Five Star Hotel Case : Kirit Somaiya
Devendra Fadanvis: फडणवीसांच्या 'गुडबुक'मधील 'या' अधिकाऱ्याला क्लीन चिट; महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा !

हॉटेलचे काम थांबवण्याचे आदेश देताना पालिकेने आपल्याला कोणतीही कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असे वायकरांनी म्हटले होते. पालिकेची ही भूमिका नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचे वायकर यांचे म्हणणे होते. तर याच्या उलट परवानगी घेताना वायकरांनी काही तथ्य लपवल्याचा पालिकेने दावा केला आहे. वायकरांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Ravindra Waikar Five Star Hotel Case : Kirit Somaiya
Maan BJP News : परिक्रमा पंकजा मुंडेंची; चर्चा खासदार-आमदारांच्या अनुपस्थितीची

वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलच्या कामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, याबाबत सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. "आमदार वायकर यांचे पाचशे कोटींचे पंचतारांकित हॉटेल लवकरच जमीनदोस्त होणार, या प्रकरणी वायकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे." यामुळे आता वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com