Maratha Reservation News: टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका; जरांगे पाटलांची मराठा तरुणांना विनंती

Manoj Jarange News: आंदोलनाला गालबोट लागेल, असे काही करू नका..
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Jalna Maratha Protest: "मराठा आरक्षणासाठी आपला लढा सुरू आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, शांततेत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल, आंदोलनाला गालबोट लागेल, असे काही करू नका," असे कळकळीचे आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना केले.

"आंदोलन करताना तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुमच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतील,"असे जरांगे म्हणाले. "माझ्यावर विश्वास ठेवा, कोणीही उग्र आंदोलन करू नका,"असे आवाहन जरांगेंनी केले आहे. पत्रकारांशी ते बोलत होते.

Manoj Jarange
BJP Meeting News : फडणवीस-बावनकुळेंची आमदार-खासदारांशी 'वन टू वन' चर्चा; असमाधानकारक कामगिरी असलेल्या...

मराठा समाजाच्या आंदोलनाला सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे. आंदोलनाला यश मिळणार आहे. तरुणांनी आत्महत्या केली तर आरक्षणाचा फायदा कुणाला मिळणार ? आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा, हाच आमचा अट्टहास असल्याचे जरांगेंनी सांगितले.

Manoj Jarange
Dhangar Reservation News : विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला ; आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक...

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा विषय हा कायदेशीर आहे. सध्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. त्यावर आरक्षण द्यावयाचे झाल्यास केंद्र सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच काँग्रेसची भूमिका आहे. ते टिकणारे असावे, यासाठी केवळ बैठका घेऊन चालणार नाही," असे चव्हाण म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com