Devendra Fadanvis, Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam On BJP: बाळासाहेबांच्या मृत्यूवरुन राजकारण पेटवल्यानंतर कदमांनी उकरुन काढला पुन्हा नवा वाद; फडणवीसांच्या लाडक्या नेत्यावरच संशय

Mahayuti Politics: माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह मातोश्रीवर ठेवला, तसेच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेतल्याचे गंभीर आरोप केले होते. यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना चवताळली असतानाच कदमांनी आता पुन्हा नवा वाद उकरुन काढला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणांची जेवढी चर्चा झाली नाही,ती दसरा मेळाव्यात शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम यांच्या भाषणाची होत आहे.दोन दिवस लोटले,तरीही रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी केलेल्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह मातोश्रीवर ठेवला, तसेच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेतल्याचे गंभीर आरोप केले होते. यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना चवताळली असतानाच कदमांनी आता पुन्हा नवा वाद उकरुन काढला आहे.

एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवरुन केलेल्या गंभीर आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.याचवेळी त्यांनी काही खळबळजनक दावेही केले. परबांनी पुन्हा एकदा डान्सबारचा मुद्दा तापवतानाच दुसरीकडे 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतले की, त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करावी,असा जिव्हारी लागणारी टीका केली.यावर आता रामदास कदम यांनी परबांच्या आरोपांवरुन थेट भाजपच्या बड्या नेत्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अनिल परबांनी विधान परिषदेच्या सभागृहात अधिवेशन काळात सावली डान्सबारवरुन केलेल्या आरोपांनंतर आता नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी त्यांनी थेट विधान परिषदेचे सभापती आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडेच संशयाचं बोट दाखवलं आहे.

कदम म्हणाले,'अनिल परबांनी 'सावली बार'वरुन योगेश कदमांवर जे आरोप केले.त्यात बारमध्ये तरुणी अश्लील नृत्य करत असल्याचा दावाही केला.पण मी सुध्दा 32 वर्षे विधिमंडळाचा सदस्य राहिलो असून एखाद्या आमदाराला असे आरोप करण्यापूर्वी 35 च्या अंतर्गत नोटीस द्यावी लागते. नोटीस न देता असे आरोप करताच येत नाहीत.

मात्र, अनिल परब यांनी कोणत्याही नोटिशीशिवाय राज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांवर आरोप केले.त्यावेळी विधान परिषदेच्या अध्यक्षांनी परबांना का अडवलं नाही? असा सवाल उपस्थित करत राम शिंदेंवरच शंका घेतली.यावेळी आपण तीन दशकं विधिमंडळाचा सदस्य राहिलेलो असून मला हे कळत नाही का?'असाही हल्लाबोल केला.

रामदास कदम यांनी यावेळी धक्कादायक दावे केले आहेत.त्यात अनिल परब यांनी चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. बघणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,अनिल परब यांच्यासारखी व्यक्ती एका बिल्डरसोबत गाडीतून बकरा घेऊन आली होती. त्यांच्यासोबत दोन नग्न बाबाही होते.तिथे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख करत बकऱ्याचा बळी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तसेच 'आपण शिकलेली व्यक्ती आहोत,हे अघोरी कृत्य आपल्याकडून होता कामा नये असं म्हणत या प्रकरणावर अनिल परब यांनी स्वतः खुलासा करावा,अशी मागणीही कदम यांनी यावेळी केली आहे. अन्यथा,आपल्याला नाईलाजाने या घटनेची चौकशी करावी लागेल,असा इशाराही त्यांनी दिला.याचदरम्यान,अनिल परब माझ्या मुलाच्या मागे हात धुवून लागले आहेत.योगेश कदम मंत्री झाल्यापासून ते त्यांचा राजीनामा मागत आहेत.पण अनिल परबांना राजीनामा हवा आहे म्हणून काही राजीनामा होत नसतो,असा चिमटाही रामदास कदम यांनी काढला.

पत्नीला स्टोव्हच्या आगीतून वाचवलं...

शिवसेना नेते रामदास कदम यांनी परबांकडून करण्यात आलेल्या वैयक्तिक आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.1993 साली त्यांच्या पत्नीला स्टोव्हच्या आगीतून वाचवल्याचे त्यांनी सांगितले.ही आग स्टोव्हवर जेवण बनवताना साडीला लागली होती आणि त्यांनी स्वतः आपल्या पत्नीला वाचवले,असे ते म्हणाले.

पत्नी सहा महिने जसलोक रुग्णालयात उपचार घेत होती आणि ते स्वतः तिच्यासोबत थांबले होते असंही म्हटलं आहे. या सर्व आरोपांमुळे दुःख आणि वेदना झाल्याचे बोलून दाखवतानाच रामदास कदम यांनी बदनामीचा दावा दाखल करून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.तसेच,बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर आईच्या नावाने बार चालवल्याच्या होत असलेले आरोपही रामदास कदम यांनी खोडून काढले. तो बार नसून ऑर्केस्ट्रा होता आणि त्याला आवश्यक परवानग्या होत्या,असे स्पष्ट केले. एका मुलीच्या विक्षिप्त हावभावांमुळे ते हॉटेल बंद केल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT