Sanjay Raut : पुण्यात टोळी प्रमुखांनी 3 सुभेदार नेमलेत; राऊतांनी मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांच्या खास माणसांची नावेच सांगितली

Sanjay Raut Targets Fadnavis Govt : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टोळी युद्धाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut On Pune Crime
Sanjay Raut On Pune Crimesarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Oct : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टोळी युद्धाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'पुण्यातील जे प्रशासन आहे ते तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतलं आहे.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एक टोळी चालवतात त्यांनी त्यांचा एक माणूस, पुण्याचा पोलीस आयुक्त म्हणून नेमला आहे. नगर विकास मंत्री यांची एक टोळी असून त्यांनी देखील महापालिका आयुक्त नेमला आहे आणि तिसरी टोळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असून त्यांनी आपला जिल्हाधिकारी नेमला आहे.

Sanjay Raut On Pune Crime
Uddhav Thackeray : नितीश कुमार, चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्ला

या तीन टोळी प्रमुखांनी पुण्यामध्ये आपले तीन मुख्य कलेक्टर नेमले आहेत. हे टोळी प्रमुख पुणे चालवत असून त्यासाठी त्यांनी आपले सुभेदार पैसे गोळ्या करण्यासाठी या ठिकाणी नेमले आहेत,' अशी टीका राऊतांनी केली.

Sanjay Raut On Pune Crime
Eknath Shinde support Manda Mhatre : मंत्री नाईकांच्या कट्टर विरोधकाचं एकनाथ शिंदेंना 'छुपं' बळ? तोडग्यासाठी भाजप श्रेष्ठींचं देखील डोकं बंद?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कारकीर्द पाहिल्यास त्यांचं आत्तापर्यंत कोणताही भरीव असं कार्य पाहायला मिळत नाही. ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करत आहेत. त्यांचं कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते आहेत.

कधीतरी मध्ये आधी पुण्याचे पोलीस आयुक्त प्रसिद्धीसाठी गुंडांची दिंड काढतात. मुंबईचे पोलीस आयुक्त हे एकटे फिरतात. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त गुंडांना घाबरून मोठा ताफा घेऊन फिरत असतील तर तो वर्दीचा अपमान आहे. त्यांनी वर्दी काढून फिरायला हवं, असा टोलाही राऊतांनी आयुक्तांना यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com