Eknath Shinde : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजप गटाने 164 मते मिळवत बहुमताचा विश्वादर्शक ठराव जिंकला आहे. त्यांच्या विरोधात फक्त 99 मते पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण करत चौफेर फटकेबाजी केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षावर भाष्य कले. याबरोबरच त्यांनी मागील काळात केलेल्या संघर्षालाही उजाळा दिला आणि 16 लेडीज बार आपण स्वत: तोडल्याची आणि त्यानंतर 100 हून अधिक गुन्हे दाखल झाल्याची आठवणही त्यांनी आपल्या भाषणात सांगितली.
शिंदे म्हणाले, त्यावेळी ठाण्यात लेडीज बारचा मोठा सुळसुळाट होता. यामुळे प्रचंड प्रमाणात लोक बारमुळे वेडी झाली होती. पैशाची उधळण सुरु होती. मी पोलिसांकडे याबाबत खूप अर्ज दिले विनंती केली पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. तेंव्हा बायका आम्हाला शिव्या घालायच्या आणि तुम्हा पोरं काय कामाचे, असे म्हणायच्या. मात्र आम्ही काहीच करु शकत नव्हतो. अखेर मी एकट्याने त्यावेळी 16 लेडीज बार फोडले त्यामुळे माझ्यावर १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले.
पुढे शिंदे म्हणाले की, त्यावेळी मुंबईत मोठा गॅंगवॉर सुरु होता. यामुळे मी त्यांच्या निशाण्यावर मी होतो. या शिंदेंला ठार माराव लागेलं मात्र, मी तेव्हा आनंद दिघें साहेबांना सांगितले. त्यावेळी त्यांनी 3 ते 4 शेट्टी लोकांना बोलवून घेतलं अन् सांगितलं जर एकनाथला काही झालं तर बघा, असा दमच त्यांना दिला होता. त्यानंतर विषय तिथचं संपला, अशी आठवण शिंदेंनी सांगितली.
याबरोबरच शिंदे यांनी बंडखोरीबद्दल म्हणाले की, मी माझ्या सोबत येणाऱ्या आमदारांना सांगितलं की, चिंता करू नका. ज्या दिवशी मला वाटेल, की तुमचं नुकसान होतंय त्या दिवशी मी तुमचं भवितव्य सुरक्षित करुन मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल. ही काही छोटी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही ईकडून तिकडे जाण्याची हिंमत करत नाही. हे का झालं? कशासाठी झाल? का केलं? या सर्वांच्या मुळाशी जायला पाहिजे होतं तसेच याचे कारणही शोधायला हवे होते, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान आम्ही गुजरातला जाताना एकही आमदार मला म्हणाला नाही की आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. हा त्यांचा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. हे सुनिल प्रभूंनाही माहिती आहे की, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. याचे तुम्ही साक्षीदार आहात. शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं की जे होईल ते होऊदे मात्र लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो तरी चालेल मात्र बाकीचे वाचतील, असे शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.