Eknath Shinde: शिंदे-भाजप सरकारने आज बहुमताचा (Floor test in Maharashtra) प्रस्ताव 164 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 99 इतकेच मते मिळाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात जोरदार भाषण करत जोरदार फटकेबाजी केली. याबरोबरच काही दिवसांपुर्वी सोबत काम केलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यपद्धतीबद्दल स्तुती केली. मात्र, दुसरीकडे त्यांनी पुणे जिल्ह्याच्या 875 कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ास मंजुरी दिलेल्या कामाला स्थगिती देत पवारांना मोठा दणका दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या कालावधीत जिल्हा नियोजन समित्यांना मोठ्या प्रमाणात निधिचे वाटप झाल्याचा आणि त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला होत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. यासंदर्भात शिवसेना नेते आणि माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र देण्यात आले होते. यानंतर लगेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवतारे यांनी दिलेल्या पत्रात पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या 875 कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ास मंजुरी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने लगेचचं 1 एप्रिलनंतर प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजुर करण्यात आलेल्या प्रशासकीय कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नवीन सरकारकडून प्रत्येक जिल्हांसाठी नवीन पालकमंत्र्यांची निवड करण्यात येणार असून जिल्हा नियोजन समित्यांचेही पुनर्गठणही करण्यात येणार आहे. यामुळे नवीन समित्यांनी मान्यता दिली तरच यापढे 1 एप्रिलनंतर मंजुर केलेल्या कामांनाच निधी मिळणार आहे. यामुळे हा महाविकास आघाडी सरकारने सरकारच्या शेवटच्या काळात मंजूर केलेल्या निधींना आता कात्री लागणार हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनीही नाशिक जिल्हा नियोजन कार्यसमितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या ५६८ कोटींच्या निधी वाटपा संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिंदे यांनी लगेचच नाशिकचे माजी पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का देत देण्यात येत असलेल्या निधी वाटपाला स्थगिती दिली होती. आता त्यापाठोपाठ शिंदे यांनी अजित पवारांनाही धक्का दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.