औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या आझमींना जीवे मारण्याची धमकी..

` अबू आझमी कहा है, हमको उनके सीने मे गोली मारनी है`, अशी धमकी दिली. तेव्हा हा विषय गांभीर्याने घ्यावा, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करा. ( Abu Azmi)
Samajwadi Party Mla Abu Azmi
Samajwadi Party Mla Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळत असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजुर केला. (Mumbai) त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी नाराजी व्यक्त केली होती. काल विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर बोलतांना अबू आझमी यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले.

मुस्लिमांच्या नावाने असलेल्या शहरांची नावे का बदलता ? असा सवाल आझमी यांनी केला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध दर्शवल्यामुळे आज अबू आझमी यांना निनावी फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. (Maharashtra) या संदर्भात आज सभागृहात आमदार रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच आझमी यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील केली.

शेख यांनी सांगितले की, अबू आझमी यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काल सभागृहात विरोध दर्शवला होता. दोन समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असून अशाने देश आणि राज्यात फूट पडेल. तुम्हाला नाव द्यायचे असेल तर द्या, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने नवे शहर उभारा,आम्ही स्वागत करू. पण मुस्लिमांच्या नावाने असलेल्या शहरांची नावे का बदलता ? असा सवाल आझमी यांनी केला होता.

त्यानंतर आज आझमी यांच्या मोबाईलवर काही अज्ञात व्यक्तींनी फोन केला आणि नामांतराला विरोध का करता म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. काल देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात फोन करण्यात आला होता. तेथील स्टाफने तो उचलला तेव्हा `अबू आझमी किधर है, उन्होने औरंगाबाद, उस्मानाबाद के नामांतर पर विरोध क्यू जताया, हम उनको जानसे मार देंगे`, अशी धमकी दिली.

Samajwadi Party Mla Abu Azmi
बंडखोरांना शिव्या देणारे बांगर हे आमच्याकडे कसे आले, हे मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले..

त्यानंतर आज देखील ११ वाजता आझमी यांच्या मोबाईलवर निनावी फोन आला, तो त्यांच्या सहायक्काने उचलला तेव्हा देखील समोरच्या व्यक्तीने ` अबू आझमी कहा है, हमको उनके सीने मे गोली मारनी है`, अशी धमकी दिली. तेव्हा हा विषय गांभीर्याने घ्यावा, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करा, अशी मागणी देखील आमदार शेख यांनी सभागृहात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com