Ajit Pawar, Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Wadettiwar : माझं बारामती सोडण्याचं धाडस नाही; वडेट्टीवार कुठूनही निवडून येतात; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Opposition Leader And Ajit Pawar : वर्षानुवर्षे वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद मिळावे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : सत्ताधारी-विरोधकांमधील टोकाच्या संघर्षाने तापलेल्या विधीमंडळ अधिवेशनात नवे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या निवडीने खेळीमेळी दिसून आली. वडेट्टीवारांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बाळासाहेब थोरातांच्या मिश्‍किल टिपण्णी, चिमटे, कोपरखळ्यांनी सभागृहात हशा पिकला. वडेट्टीवारांच्या राजकीय धडाडीचे तोंड भरून कौतुक करीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर आपण बारामती सोडून इतरत्र लढण्याचे धाडस दाखवू शकत नसल्याचे सहजपणे सांगितले. (Latest Political News)

विजय वडेट्टीवार यांचा जनसंपर्क मोठा असल्याने मतदारसंघ बदलूनही निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रात मतदारसंघ बदलताना विचार करावा लागतो. मी बारामतीतून लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, मात्र शेजारच्या मतदारसंघातून उभे राहण्याचे धाडस करणार नाही, असे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवारांसारख्या कर्तृत्वान नेत्याला काँग्रेसकडून महत्वाची खाती मिळालेली नाहीत, असे खंतही व्यक्त केली. यापुढे वडेट्टीवारांना वर्षानुवर्षे विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर पवारांनी त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. पवार म्हणाले, "विरोधी पक्षनेते हे पद सन्मानाचे, मानाचे आणि जबाबदारीचे आहे. लोकांची सरकारकडून जेवढी अपेक्षा तेवढीच विरोधी पक्षनेत्याकडूनही असते. मुख्यमंत्री काम करतो मात्र सरकारकडून काम करवून घेण्याचे काम विरोध पक्षनेते करतात." विरोधी पक्षनेत्याला उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगून पवारांनी पूर्ण यादीही यावेळी सांगितली.

यावेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनाही चिमटे घेतना अजित पवार म्हणाले, "विद्यार्थीदशेपासून काम केल्याने वडेट्टीवारांची वैचारिक बैठक पक्की आहे. त्यांच्या रुपाने आता विदर्भाला आणखी एक खंबीर नेता मिळाला आहे. विदर्भात शिवसेना वाढवण्याचे काम केल्यानेच त्यांना विधानपरिषदेत जागा मिळाली. मतदारसंघ बदलूनही निवडून आलेल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये इतरांना मिळाली तशी चांगली खाती मिळालेली नाहीत. मी स्पष्ट बोलतो, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही."

अजित पवारांनी पुढील निवडणुकीत आपलाचा विजय होणार असल्याचेही सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, "वडेट्टीवर रस्त्यावरून लढणारे नेते आहेत. आता विरोधीनेते म्हणून त्यांना सभागृहात लढावे लागणार आहे. निवडणुका वर्षावर आलेल्या आहेत. वडेट्टीवारांसारख्या लढावू नेत्याला वर्षानुवर्षे याच पदावर बसण्याची संधी मिळावी, ही प्रार्थना करतो. संख्येने कमी असले तरी विरोधी पक्ष आणि विरोधपक्षनेता लोकशाहीत महत्वाचा असतो. राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असेल", असेही पवार यावेळी म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT