Devendra Fadnavis in Assembly Session : आता संग्राम थोपटेंचे काय होणार ? देवेंद्र फडणवीसांनी जखमेवर चोळलं मीठ

Devendra Fadnavis Talk About Sangram Thopate : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थोपटेंचा उल्लेख केला.
Devendra Fadnavis, Sangram Thopate
Devendra Fadnavis, Sangram ThopateSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnvis in Mansoon Session : ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रसचे आमदार संग्राम थोपटेंना आता विरोधी पक्षनेतेपदानेही हुलकावणी दिली आहे. नव्या विरोधी पक्षनेत्याच्या नावांची चर्चा असतानाच थोपटेंनी दिल्लीत तळ ठोकूनही या पदावर ऐनवेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या नावावर हायकमांडने मोहोर उमटवली. त्यातून थोपटे नाराज असल्याच्या चर्चा पसरल्या.

विधानसभेत वडेट्टीवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली; तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थोपटेंचा उल्लेख केला. ‘आता संग्राम थोपटेंचे काय होणार ? असा सवाल करीत, फडणवीसांनी थोपटेंना चिमटा काढला. त्यावरून सभागृहात हशा पिकला; पण फडणवीसांच्या या विधानामुळे कॉंग्रेसमध्ये थोपटेंना आता काय मिळणार ? प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा असल्याने यापदासाठी पुन्हा थोपटेंचे नाव चर्चेत येणार का, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

Devendra Fadnavis, Sangram Thopate
Eknath Shinde In Assembly Session: नाना पटोलेंचा राजीनामा ‘ये अंदर की बात है’; मुख्यमंत्र्यांचे सत्ताबदलावर नेमके बोट....

काँग्रसच्या आधी सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारमध्ये थोपटे मंत्री होणार असल्याचे खात्रीने सांगितले जात होते. त्यासाठी थोपटेंनी हायकमांडला ‘मॅनेज’ केले होते, असेही सांगितले गेले. पण तेव्हा शेवटच्या क्षणी थोपटेंचा पत्ता कट झाला. पुढे याच सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर थोपटेंना अध्यक्षपद मिळणार असल्याचे बोलले गेले. ही निवड लांबत गेली आणि थोपटे ताटकळतच राहिले. शिंदेंच्या बंडाने सरकार कोसळले आणि थोपटेंच्या पदरी काहीच पडणार नसल्याचे स्पष्ट झाले.

शिंदें-फडणवीसांसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांमुळे विरोधी पक्षनेतेपद मोकळे झाले. त्यावर डोळा ठेवलेल्या थोपटेंनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत, या पदाची मागणी केल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी वडेट्टीवारांसह काँग्रसच्या सहा नेत्यांची नावे पुढे आली. त्यात थोपटे काहीसे मागे पडले. तरीही, काहीही करून विरोधी नेत्यांचा प्रमुख होण्यासाठी थोपटेंनी हायकमांडसोबत चर्चा केल्या. मात्र, प्रदेश काँग्रेसमधील वादात हे वडेट्टीवारांच्या वाट्याला गेले. त्यामुळे थोपटेंचे काय होणार,अशा चर्चा होऊ लागल्या. अशात काँग्रेसमधील राजकारण जाणून असलेल्या फडणवीसांनी थोपटेंच्या राजकीय भविष्यावर भाष्य केल्याने, थोपटे चांगलेच चर्चेत आले.

Devendra Fadnavis, Sangram Thopate
Eknath Shinde on Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना झोडपले..

विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस म्हणाले, "आता माझ्या पदात बदल होणार नाही. माझ्यावर जी जबाबदारी आहे, त्यात मी समाधानी आहे. २०१९ वर्षांचे खरे हिरो आमचे शिंदे साहेब आहेत. ज्याला न्याय मिळत नाही, तिथे आम्हाला न्याय द्यावा लागतो. वडेट्टीवार आक्रमक असले तरी मृदू स्वभावाचे आहे, विरोधीपक्ष नेतेपदी ते चांगले काम करतील, असे फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com