Aaditya Thackeray-Dada Bhuse Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : ‘मला कृषिमंत्रिपद नको, इतर कोणतंही खातं द्या; दादा भुसेंचा आग्रह होता’ : आदित्य ठाकरेंचा दावा

Aditya Thackeray's Allegation On Dada Bhuse : अकरावी प्रवेशाच्या यादीचा घोटाळा, समृद्धी महामार्गाचही नदी झाली होती. ज्या महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, त्याच महामार्गावर खड्डे पडलेले आहेत, त्याच महामार्गावर नदी वाहत आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 29 June : राज्यात अनेक विषय आहेत. जे महाराष्ट्रद्वष्ट्ये आहेत, त्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पाप तर आहेच. पण ज्या पद्धतीने महायुती किंवा महाझुठी म्हणजे भाजप आणि दोन गद्दार गॅंग ज्या पद्धतीने सरकार चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. या तिघांची तीन दिशेला तोंडे आहेत. त्यांची एकमेकांमध्ये भांडणे आहेत. पालकमंत्रिपदावरून त्यांच्यात भांडणं आहेत. चक्क मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री भांडत असतात, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

पावसाळी अधिवेशानाच्या तोंडावर सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर जोरदार प्रहार केले.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, भ्रष्टाचार डाग असलेले अनेक जण मंत्रिमंडळात आहेत. भाजपचे सरकार भ्रष्टाचारी झालेले आहे. त्यातील सर्वांत मोठा घोळ कदाचित घोटाळाही समोर येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे. आम्ही यासंदर्भात आंदोलन करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे कदाचित घाबरून सरकारने अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली असेल. मात्र या यादीत अनेक गोंधळ झाल्याची तक्रार पालकांकडून होत आहेत. त्या यादीत समावेश करण्यासाठी किंवा पसंतीचं कॉलेज मिळण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांनी पैसे खाल्ले आहेत का, असा प्रश्न आमच्या येत आहे

राज्यातील शाळांमध्ये सक्तीची हिंदी लादण्याचा परिपत्रक ह्याच दादा भुसे यांनी काढले आहे. हेच ते दादा भुसे आहेत की महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला कृषिखातं नको मला इतर कोणतंही खातं द्या, असे आम्हाला म्हणत होते. ह्याच दादा भुसेंनी मागील अडीच वर्ष एमएसआरडीसी खांत सांभाळलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांनी हे खांत सांभाळलं होतं, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, अकरावी प्रवेशाच्या यादीचा घोटाळा, समृद्धी महामार्गाचही नदी झाली होती. ज्या महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, त्याच महामार्गावर खड्डे पडलेले आहेत, त्याच महामार्गावर नदी वाहत आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावर सुमारे साडेबारा कोटी वाहनांना चुकीची फाईन लावून एमएसआरडीसीने घोटाळा केलेला आहे.

सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा, तसेच लाडक्या कॉन्ट्रक्टरकडून काढलेले पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी तसेच, पक्षाच्या बळकटीकरणारसाठी वापरले जात आहेत. त्याच भ्रष्टाचारनाथ शिंदेंना सूरत, गुवाहाटी आणि वॉशिंग मशिनमध्ये उडी मारावी लागली होती. भुमरेंच्या ड्रायव्हारने फुकटात पॉपर्टी घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांना दिसतं की दिसत नाही. युतीधर्मामुळे त्यांचे हात बांधले आहेत का. ते हात बांधून बसले आहेत का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT