NCP News : पवारांच्या लाडक्या आमदाराची कबुली; ‘साहेब अन्‌ दादांनी एकत्र यावे, अशी पवारांसह जयंत पाटील, सुळेंना विनंती केली होती’

Abhijeet Patil Statement : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माढा मतदारसंघातील विविध कामाच्या अनुषंगाने आम्ही भेट घेत असतो. ते आम्हाला विरोधी गटातील आमदार असूनही आदराने वागवतात.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Madha, 28 June : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहे. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी या चर्चेला तोंड फोडले होते. मात्र, ही चर्चा सोलापूर जिल्ह्यातील चार आमदारांनी एकत्र येऊन ही मागणी केल्यानंतर सुरू झाली होती, असे आमदार उत्तम जानकर यांनीच उघड केले होते. त्याबाबत आता माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही ‘आपण शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडे एकत्र येण्याबाबत विनंती केली होती,’ अशी कबुली दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे माढ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, अशी कार्यकर्त्यांची तसेच जनभावना आहे. दोन्ही पवारांनी एकत्र आल्यास आनंदच होईल.’

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्र यावेत, यासाठी मी स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोललो आहे. दोन्ही पवार एकत्र आले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, असा दावाही माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार, अशी चर्चा सुरू होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानंतर या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या समझोत्याचा मुद्दा सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या चार आमदारांनी सुरुवातीला मांडला होता. तशा बातम्याही माध्यमांमध्ये आल्या हेात्या. याशिवाय खुद्द उत्तम जानकर यांनीही तसा दावा केला होता.

Abhijeet Patil
Solapur Politic's : सोलापुरात पवारांच्या पक्षाला धक्का; राजू खरेंनंतर आणखी एका आमदाराची एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर हजेरी

त्यासंदर्भात आमदार अभिजीत पाटील म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे, अशी रोखठोक भूमिका आपण स्वतः खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून मांडली होती.

Abhijeet Patil
Solapur Politic's : सोलापुरात पवारांच्या पक्षाला धक्का; राजू खरेंनंतर आणखी एका आमदाराची एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर हजेरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माढा मतदारसंघातील विविध कामाच्या अनुषंगाने आम्ही भेट घेत असतो. ते आम्हाला विरोधी गटातील आमदार असूनही आदराने वागवतात. कामाच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देतात, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पवार एकत्र आल्यास पवार कुटुंबीय एकत्रित येतील, याचा आनंद सर्वसामान्यांना नक्कीच होईल, असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com