IAS officer Tukaram Mundhe given charge of three departments Sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली! आता धडाकेबाज अधिकारी सांभाळणार तीन महत्वाच्या खात्यांचा कारभार

Tukaram Mundhe Transfer: आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे.

Amit Ujagare

Maharashtra government new role for Tukaram Mundhe: आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. सध्या मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या मुंढे यांच्याकडं नव्या बदलीच्या ठिकाणी तीन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळं आता या नव्या विभागामध्ये ते कशा पद्धतीनं सुधारणा घडवून आणतात हे पाहावं लागणार आहे.

तुकाराम मुढेंकडं हे महत्वाचे विभाग सोपवले

तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्याकडं आता मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग ही तीन खाती सोपवण्यात आली असून या विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहणार आहे. यापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी या मंत्रालयातील अनेक गैरप्रकार बाहेर काढले होते, त्यामुळं या विभागाला एकप्रकारे शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलं होतं.

बदल्यांचा विक्रम

तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २३ ते २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. याचं मुख्य कारण राजकीय हस्तक्षेप मोडून काढणे, थेट आणि कठोर निर्णय घेणे तसंच भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी उचललेली पावलं कारणीभूत आहेत. ते नेहमीच 'नो-नॉनसेंस' दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळं राजकीय नेत्यांशी अनेकदा त्यांचा संघर्ष झालेला आहे. (उदा. नवी मुंबई, नागपूर स्मार्ट सिटी प्रकरणात नितीन गडकरींसोबत वाद).

कुठे केलीत कामं?

आत्तापर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी (सोलापूर, जालना), नवी मुंबई/नाशिक महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका वाहतूक महामंडळ (PMPML) CMD, विकास आयुक्त (असंघटित कामगार), कृषी विभाग सचिव इत्यादी पदांवर काम केले आहे. दुष्काळग्रस्त भागात आणि शहर प्रशासनात चांगले काम केल्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT