Ashok Kharat : SIT चौकशीत नवीन अपडेट: 40 ते 45 नेते खरातच्या संपर्कात; राजकीय निर्णय घेण्यापूर्वी घेत होते सल्ला

Captain Ashok Kharat Case News Update: एसआयटी चौकशीत नवीन माहिती समोर आली आहे. ४० ते ४५ नेते अशोक खरात यांच्या संपर्कात होते. राजकीय निर्णयांपूर्वी ते त्यांचा सल्ला घेत होते.
40 to 45 political leaders in contact with Ashok Kharat
40 to 45 political leaders in contact with Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra SIT investigation into Ashok Kharat contacts: भोंदू अशोक खरात प्रकरण तपासणीचा आज एसआयटीचा 13 दिवस आहे. खराटे यांच्या कार्यालयात अनेक वस्तू सापडल्या आहेत. एसआयटीच्या तपासात पोलिसांनी रोज नवीन अपडेट मिळत आहेत. अशोक खरातच्या संपर्कात नियमितपणे 40 ते 45 राजकीय नेते होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

अशोक खरातचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्या डेटामधून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यात अनेक नेत्यांचे नावे ही कोडवर्डमध्ये सेव्ह केले असल्याची माहिती समोर येत आहे. खरातच्या मोबईलमध्ये त्याने अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह केले असल्याचे तपासात आढळले आहे.

कोणतीही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती आहे. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असत.

40 to 45 political leaders in contact with Ashok Kharat
Ashok Kharat News: मनोज जरांगे यांच्यासोबत खरातचा फोटो? हाके म्हणतात, "फडणवीसांनी खरातची जात सांगावी...

अशोक खरात प्रकरणी SIT कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होत आहे. भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत ही सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाव छापली असल्याचे समोर आले असून ही लग्नपत्रिका समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली आहे.

40 to 45 political leaders in contact with Ashok Kharat
Vijay Thalapathy News: विजयनं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट!! बाप-लेक भावूक; व्हिडिओ पाहा

खरातच्या अटकेच्या वेळी त्याचा लॅपटॉप, मोबाईलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यातील डाटा तपासणी सुरु आहे. खरात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयीतांची कसून चौकशी पोलिस करीत आहेत. त्याचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. डिजिटल पुरावे, आणि इतर पीडित महिलांची माहिती घेतली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com