Sanjeev Jaiswal viral video Sarkarnama
मुंबई

IAS viral video : तू घुसखोर निघालास तर तुला इथून उचलून घेऊन जाईन! मुंबईतील IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

MHADA CEO Sanjeev Jaiswal viral video : संजीव जयस्वाल यांच्या या विधानानंतर काही तरूण आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर जयस्वाल यांनी तुमची काही संवाद साधायची इच्छा नाही, असे म्हणत संवाद थांबविला.

Rajanand More

IAS officer Mumbai news : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मुंबईतील गोरेगावातील मोतीलाल नगर येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण नुकतेच झाले. यावेळी स्थानिक नागरिक आणि जयस्वाल यांच्यातील वादाचा व्हिडीओ समोर आला आहे.

संजीव जयस्वाल यांच्याकडून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात असतानाचा हा व्हिडीओ आहे. रहिवाशांच्या काही मागण्यांवरूनही वाद झाला. यावेळी जयस्वाल आक्रमक झाले होते. संवाद अर्धवट थांबवून त्यांनी हा कार्यक्रम आटोपता घेतला. या जनसभेतील एका संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये एक तरूण हातात पोस्टर घेऊन उभा असल्याचे दिसते. त्याला उद्देशून जयस्वाल हे तुला मराठी येत नाही का, अशी विचारणा करतात. त्यावर तरूणाकडून नकारार्थी उत्तर येते. त्यानंतर जयस्वाल त्याला खाली बसण्यास सांगून हिंदीतून त्याच्याशी बोलू लागतात. यादरम्यान ते आक्रमक झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

जयस्वाल यांनी लगेच त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली. पोलिसांना त्याच्याकडून ओळखपत्र घेण्यास सांगितले. आयकार्ड दे तुझी शहानिशा करतो मी. कुठून आला, कधी आला, इथं जन्माला की नाही, तुझ्याविषयीची ही माहिती काढतो. आणि जर तु घुसखोर निघालास ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईल, असे विधान जयस्वाल यांनी केले.

जयस्वाल यांच्या या विधानानंतर काही तरूण आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर जयस्वाल यांनी तुमची काही संवाद साधायची इच्छा नाही, असे म्हणत संवाद थांबविला. जयस्वाल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT