

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर आसूड ओढला. काँग्रेससह तृणमूल काँग्रेसवरही जोरदार टीका केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन तृणमूल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गर्भित इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी बंकुरा येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल चढविताना अल्टीमेटम दिला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपण नवा इतिहास घडविणार असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी टीएमसी नेत्यांच्या भाषेवरून त्यांना पराभवाची भीती वाटत असल्याची टीका केली.
टीएमसीच्या मोठ्या नेत्यांची धमकावणारी भाषा, त्यांचे रडगाणे म्हणजे चार मेआधीचा एक्झिट पोल आहे, असे विधान करत पंतप्रधानांनी इशारा दिला. ते म्हणाले, मी टीएमसीचे गुंड, सिंडीकेट आणि भ्रष्टाचाऱ्यांना शेवटची संधी देत आहे. तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात २९ एप्रिलपूर्वी शरण या. ४ मेनंतर कुणालाही सोडणार नाही.
महिला आरक्षणावरून टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बंगालच्या महिलांना धोका दिला. घुसखोरांसाठी सातत्याने कायदे आणि नियम तोडणारा हाच पक्ष आहे. धर्मावर आधारीत आरक्षणाला प्रोत्साहन देणाराही हाच पक्ष आहे. असे करून ते संविधानाचे महत्व कमी करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी टीएमसीवर टीका करताना म्हटले की, टीएमसीने आदिवासी बहिणी आणि मुलींचा नेहमीच द्वेष केला. भाजपने देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती दिल्या. कारण आम्हाला आदिवासी समाजाला सक्षम करायचे आहे. तर टीएमपी आदिवासींचा अपमान करते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधित करणारे भाषण वादात सापडले आहे. विरोधकांनी हे भाषण म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हटले आहे. पाच राज्यांसाठी आचारसंहिता लागू असताना सरकारी यंत्रणांचा वापर करत विरोधी पक्षांवर टीका करणे चुकीचे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या भाषणाविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.