Tukaram Mundhe Meet Narhari Zirwal  sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe Meet Minister : तुकाराम मुंढेंनी घेतली राष्ट्रवादीच्या मंत्र्याची भेट, मिळाला खास संदेश; 'आम्ही दोघेही...'

Tukaram Mundhe FDA Ministry : तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांची सदिच्छा भेट घेतली. या विषयी झिरवळ यांनी माहिती दिली आहे.

Roshan More

Tukaram Mundhe News : IAS तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची नियुक्ती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली. दोन दिवसापूर्वी त्यांनी कार्यभार देखील हाती घेतला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेतली.

नरहरी झिरवळ हे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंचे ते बाॅस असणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी झिरवळ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर झिरवळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, 'कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयात विभागाचे मंत्री म्हणून माझी सदिच्छा भेट घेतली.'

'प्रशासकीय कार्यातील त्यांचा अनुभव, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यांचा विभागाच्या कार्यक्षमतेस निश्चितच सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास आहे. विभागाच्या प्रगतीसाठी आणि जनहिताच्या दृष्टीने आम्ही दोघेही समन्वयाने व प्रभावीपणे कार्य करू, नव्या जबाबदारीच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!', असा संदेश देखील त्यांनी मुंढे यांना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिला आहे.

विभागाला शिस्त लावणार

अन्न व औषध प्रशासन विभाग मागील काही काळापासून वादग्रस्त ठरला आहे. या विभागातील एक जण मंत्रालयात लाच घेताना सापडला. तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते या विभागाला चांगलीच शिस्त लावतील, अशी चर्चा त्यांच्या नियुक्तीनंतर आहे. दरम्यान, मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या 25 वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या विभागात ते किती काळ असणार याविषयी देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT