Nitesh Rane on Uddhav Thackeray:
Nitesh Rane on Uddhav Thackeray:  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane on Uddhav Thackeray: कर्जत फार्महाऊसची जमीन खोदली तर...; राणेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

Nitesh Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसमध्ये भूमिगत पैशाचे गोदाम आहे. तिथे जाऊन बघा, जमीन खोदली तर खूप काही सापडेल, दोन हजारांची झाडं कुठून लावली, त्याची चौकशी झाली पाहिजे, असा धक्कादाय आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. (If the land of Karjat Farmhouse is dug up...; Rane's serious allegations against Thackeray)

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंच्या कर्जतमधील फॉर्महाऊसमध्ये दोन हजारांच्या नोटा लपवून ठेवल्या आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशातून कमावलेल्या 2000 च्या नोटांचे बंडल कर्जत फार्म हाऊसमध्येच ठेवल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane Alligations)

इतकेच नव्हे तर, ठाकरे सरकारने कोविड काळात केलेला भ्रष्टाचार, जनतेकडून उकळलेले पैसे आणि दैनिक सामना'तील जाहिरातींच्या नावांवर केलेला भ्रष्टाचार याचा पैसा ठेवायचा कुठे? असा प्रश्न आता उद्धव ठाकरेंना पडला असेल. याशिवाय युवासेनेतून तिकीट देण्यासाठी इच्छुकांना दोन कोटींची मागणी केली जात आहे. असाही आरोप राणेंनी यावेळी केला. निष्ठावान सैनिकांना मान सन्मान न मिळणं, हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती पैशाशिवाय काहीही मिळत नाही. पैसे द्या आणि तिकीट घ्या, असा कारभार सुरु असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. (Rane- Thackeray controversy)

नितेश म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींचे तिकीट कार्ड देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी पैसे घेतल्याशिवाय एकही तिकीट दिले नाही, आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही तेच काम करतो. असाही आरोप राणेंनी केला आहे. तसेच, तुझ्या मालकाला कलानगरमध्ये कोणी ओळखत नाही. फुकट्या सारखं परफ्यूम सुधा तो स्वतः च्या पैशांनी वापरत नाही. दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

दोन दिवसांपासून मातोश्रीवर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी किती लोक येत आहेत, याची माहिती राऊतने घ्यावी. तुझ्या मालकाने नंदकिशोर चतुर्वेदीकडे किती पैसा ठेवलाय, त्याचाही हिशोब द्यावा लागेल. ज्यादिवशी नंदकिशोर भारतात येईल आणि सत्य सांगेल तेव्हा कळेल की पैशांचा सगळ्यात मोठा दलाल हा कलानगरमध्ये बसलाय, असा घणाघातही नितेश राणेंनी यावेळी केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT